तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...

forced to withdraw Rs 20,000 from the ATM and snatched the money
forced to withdraw Rs 20,000 from the ATM and snatched the money

नागपूर : अनोळखी तरुणीने फोन करून गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. तिला भेटीसाठी गेलेल्या व्यक्तीला तीन आरोपींनी पकडले. एटीएममधून 20 हजार रुपये काढण्यास भाग पाडून बळजबरीने रक्कम हिसकावून नेली. दिवसाढवळ्या तरुणाची फसवणूक झाल्याची ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, आरोपींना पकडणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

सेमिनरी हिल्स येथील फॉरेस्ट सोसायटीमध्ये राहणारे सुजय गोडसे (39) गुंतवणुकीशी संबंधित कमे करतात. गुरुवारी दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या तरुणीने रिया बोलत असल्याचा परिचय दिला. गुंतवणुकीची इच्छ व्यक्त केली. शंकांचे समाधान करायचे असल्याचे सांगून कर्वेनगर येथील प्लॉट क्रमांक 42 येथे भेटीसाठी बोलावून घेतले. सुजय तिथे पोहोचताच 20 ते 25 वर्षे वयोगटातील तीन अनोळखी आरोपी दोन दुचाकीवरून तिथे आले.

आरोपींनी बळजबरीने सुजयच्या शर्टच्या खिशातील एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर एका दुचाकीवर बसवून सोमलवाडा चौकाजवळील आयसीआयसीआय बॅंकेजवळ नेले. धमकावून एटीएममधून 20 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. पैसे काढताच ही रक्कम हिसकावून आरोपी पसार झाले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. नागपुरात सायबर क्राईम तसेच फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींना पकडणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com