बोंबला! नागपूरच्या मेयो रुग्णालयातून चार कोरोना संशयितांचा पोबारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

नागपूर : येथील मेयो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार कोरोना संशयित रुग्णांनी पोबारा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संशयित रुग्णांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे समजते.

देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. नागपुरात बुधवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. तिन्ही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाली. 

मेयो रुग्णालयात एका स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले.

पहिल्या रुग्णाची प्रकृती स्थिर 
नागपुरात आढळलेला कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सध्या स्थीर आहे. त्याचा ताप कमी झाला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 पैकी 12 जणांची चाचणी झाली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

पहाटेच्या सुमारास काही संशयित रुग्ण पळाल्यातची बाब मेयो प्रशासनाला लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली व रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. चारही रुग्ण घरी असल्याचे कळताच मेयो प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. या चारपैकी एक रुग्ण चंद्रपूरचा आहे.

...तर तो संशयित 
एखाद्याला ताप आला, त्यावर उपचारासाठी टॅबलेट दिली. परंतु, त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसेल तर त्याला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. विदेशातून आलेल्यांनी चौदा दिवसांपर्यंत घरीच राहावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले होते. 

बालपणीच्या मित्राने केला एकीचा विश्‍वासघात, दुसरीला थाप मारून अज्ञात स्थळी नेले

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 
महापालिकेने 0712-2567021 हा आपत्कालीन क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये 24 तास वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:ही वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर, पूर्णवेळ मास्क वापरावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four corona suspected patients escaped from meyo hospital nagpur