बॅंडबाजा बारात’ टोळीने असा घातला अधिकाऱ्याला गंडा, वाचाच!

nagpur
nagpur
Updated on

नागपूर : एका ‘बॅंड बाजा बारात’ टोळीतील तरूणीने औषध उत्पादक कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो अधिकारी भेटायला आल्यावर तरूणीने कारमध्ये त्याच्याशी अश्‍लिल चाळे केले. कटानुसार सापळा रचून बसलेल्या टोळीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दीड लाख रूपये त्या अधिकाऱ्याकडून लुटले. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली. ४५ वर्षीय संजीव कुमार रा. कोराडी (बदललेले नाव) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी संजीव कुमार यांना रिया उर्फ पल्लवी उर्फ श्‍वेता उर्फ प्रिया रहांगडाले (वय २५, अमरनगर, हिंगणा रोड) हिने व्हॉट्सॲपवरून मेसेज केले. त्यांना स्वतःचे फोटो पाठवले. अनेकदा चॅटिंंग केले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्या अधिकाऱ्याने तिला कॉफीसाठी ऑफर दिली. रियाने संजीव यांना भेटण्याची तयारी दर्शविली. दहा दिवसांपूर्वी रिया त्यांना भेटली. तिने पैसे दिल्यास शारिरीक संबंधासाठी होकार दिला. त्यानंतर ते दोघेही कारने लॉंग ड्राईव्हला गेले.

असा आखला प्लॅन
संजीव यांना रियाने शुक्रवारी दुपारी दिड वाजता भेटण्याचे आमिष दाखवले. रियाला भेटायला संजीव कारने एमआयडीसीत जात होते. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजजवळ रिया भेटली. दोघेही अर्धा तास कारमध्ये बसले. प्लॅननुसार आरोपी रजत ठाकूर (२५, वैशालीनगर), सुमित व्यंकटराव परिहार (२१), गुन्नू बाटेश्‍वर मंडळ (२२), तुषार उर्फ मोनू अशोक जगताप (१९, अमरनगर) या युवकांनी त्यांना थांबविले. तिघेही कारमध्ये बसले. चाकूचा धाक दाखवून त्यांना आशीर्वाद वसतिगृहाजवळ नेले. त्यांना मारहाण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. लुटारुंनी त्यांच्या पर्समधून तीन हजारांची रोख व एटीएम कार्ड काढले. कार्डद्वारे एटीएममधून ९० हजार रुपये काढले.

रियाने उकळले ५० हजार
रियाच्या जाळ्यात अडकलेल्या संजीव कुमार यांना तब्बल चार तास कारमध्येच डांबून ठेवण्यात आले. अपघात झाल्याचे सांगून मित्राकडून ५० हजार रुपये आणण्यास संजीव कुमार यांना सांगण्यात आले. संजीव कुमार यांनी मित्राला फोन केला. मित्राने ५० हजार रुपये जमविले. मित्राने संजीव कुमार यांना फोन केला. मित्राला मंगलमूर्ती चौकात बोलाविले. त्यानंतर कारजवळ रिया आली. तिने मित्राकडून ५० हजार रुपये घेतले व पसार झाली. ५० हजार रुपये मिळताच लुटारुंनी संजीव कुमार यांना कारसह सोडले.

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'

असा लागला छडा
संजीव कुमार यांनी दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी लुटारुंचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि रियाचा पत्ता पोलिसांनी काढला. पोलिसांनी चौघांना अटक केली.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com