कोणती ही वेळ? टाळेबंदीमुळे वन्यप्राणी शहरात, माणसे घरात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

नागपूर शहराच्या आजुबाजूला अंबाझरी जैवविविधता उद्यान, व्हीएनआयटी, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शेती, वायू सेनेचे खुली मैदाने आहेत. त्यामध्ये अनेकदा मोरांचे दर्शन होत असते. जानेवारी महिन्यात अंबाझरी जैवविविधता उद्यानात बिबटचे दर्शन झाले होते. टाळेबंदी झाल्यानंतर 56 दिवसाच्या कालावधीत हिंगणा वन परिक्षेत्रात निलगाय एका घरात घुसली होती. आता टाळेबंदीमुळे मानवाचा वावर कमी झाल्याने वन विभागाच्या मुख्यालयातच मसन्याउद या प्राण्यांचे वास्तव्य केल्याने वन्यप्राण्यांचा वावर शहरासह ग्रामीण भागात वाढल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

नागपूर :  कमी झालेले प्रदूषण, शुद्ध हवा, कमी झालेला मानवी हस्तक्षेप आणि शांत, मोकळा अधिवास असे आल्हाददायक वातावरणामुळे वन्यजीव व दुर्मीळ पशुपक्षांचे दर्शन होऊ लागले आहेत. संचारबंदमुळे मनुष्य घरात बंद आणि पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असे दुर्मीळ चित्र शहर व परिसरात सध्या पाहायला मिळत आहे. याचा अनुभव राज्याचे वन विभागाचे मुख्यालय असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या मसण्याउदच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा सकारात्मक पैलू म्हणून वन्यजीवांचा मुक्त संचार ही एकमेव बाब समोर आली आहे. नागपूर शहराच्या आजुबाजूला अंबाझरी जैवविविधता उद्यान, व्हीएनआयटी, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शेती, वायू सेनेचे खुली मैदाने आहेत. त्यामध्ये अनेकदा मोरांचे दर्शन होत असते. जानेवारी महिन्यात अंबाझरी जैवविविधता उद्यानात बिबटचे दर्शन झाले होते. टाळेबंदी झाल्यानंतर 56 दिवसाच्या कालावधीत हिंगणा वन परिक्षेत्रात निलगाय एका घरात घुसली होती. आता टाळेबंदीमुळे मानवाचा वावर कमी झाल्याने वन विभागाच्या मुख्यालयातच मसन्याउद या प्राण्यांचे वास्तव्य केल्याने वन्यप्राण्यांचा वावर शहरासह ग्रामीण भागात वाढल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

वनविभागसह काही पक्षी प्रेमींनीही कॅमेऱ्यात पशू-पक्ष्यांचा हा मोकळा वावर कैद करण्यात आला आहे. त्यांमध्ये भारद्वाज, स्वर्गीय नर्तक, घुबड, सातभाई, शिंपी, भवरी, मैना, रॉबीन असे पक्षी तर निलगाय, सांबर, मसण्याउद, चितळ, रानडुक्कर मुंगूस असे प्राणी आढळून आले आहेत. सक्तीने घरी राहणे माणसांसाठी कितीही कंटाळवाणे असले तरी पश-पक्षी मात्र याचा स्वच्छंदपणे आनंद लुटत आहेत.

अवश्य वाचा- ओबीसी विद्यार्थ्यांबाबत केंद्राचा अन्यायकारक निर्णय, वाचा काय आहे प्रकार...

शहरातील सोसायटयांमध्ये कावळे, कबुतर, चिमण्या असे मोजके पक्षी दिसतात. माणसांचा वावर कमी झाल्यानंतर सोसायटीच्या गच्चीवर घुबड, घार, वटवाघूळ आश्रयाला आले आहेत. मोकळ्या बागांमध्ये विविध पक्षी बागडताना दिसत आहेत. शहरांबरोबरच ग्रामीण भागात वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांची वर्दळ वाढली आहे. बिबट्या, रान मांजरे, कोल्हे, लांडगे, मुंगूस यांच्या हालचाली आढळून येत आहेत. पाणवठ्यांच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपमध्ये या 56 दिवसांच्या काळात तब्बल हजारो छायाचित्रे टिपली गेली आहेत.

जंगलातील वर्दळ झाली कमी
ग्रामीण भागात मनुष्यप्राण्यांचे जंगलातील वर्दळ कमी झालेली आहे. त्यामुळे जंगलामध्ये वन्यप्राण्याचे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याचे छायाचित्र टिपल्या जात आहेत.
- प्रभूनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free movement of wildlife due to Lockdown