नागपुरात गॅंग वॉर... चालल्या गोळ्या

pistol
pistol

नागपूर : दिघोरीतील चामट चक्की चौक परिसरात इमरान सिद्दीकी सदरु जमाल सिद्दीकी याच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन हल्लेखोरांना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. तिघांनाही सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून माऊझर व 11 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. रफीक खान बाबू खान (वय 36,) अब्दुल शहाबाज अब्दुल रज्जाक (वय 26,दोन्ही रा.हरपूरनगर) व शाहजेब खान ऊर्फ धवन (वय 24) ,अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत. सक्करदरा पोलिसांनी तिघांनाही रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो डिलर इमरान सिद्धिकी याने वर्षभरापूर्वी मुख्य आरोपी रफिक खानवर तलवारीने हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी रफिक तयारीत होता. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता इमरान हा मित्र गुलामअली उर्फ राजा याच्यासोबत चामट चौक परिसरात गप्पा करीत होता. दरम्यान, आरोपी रफिक हा तीन साथीदारांसह दुचाकीने तेथे आला.

अंधाधुंद गोळीबार

आरोपींनी पाठीमागे लपविलेल्या पिस्तुलातून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये चार गोळ्या इमरानला लागल्या. जखमी इमरानला लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावर शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर चार बुलेट केस आणि दुचाकी जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनीट चारचे प्रमुख अशोक मेश्राम यांनी तीनही आरोपींना अटक केली. टोळीयुद्धातून इमरान याच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com