मोठी बातमी : गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली ही गंभीर घटना, तीन नराधमांनी विद्यार्थिनीला नेले झुडपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

कामठी (जि. नागपूर) : देशात गाजलेल्या 16 डिसेंबर 2012 निर्भया प्रकारणातील आरोपींना फाशी होण्याच्या एक आठवड्‌यापूर्वीच पुन्हा येथे अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी बळजबरी करून शास्त्राच्या बळावर निर्वस्त्र करून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुन्हा एक "निर्भया' वासनेला बळी पडली. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करतात.

कामठी (जि. नागपूर) : देशात गाजलेल्या 16 डिसेंबर 2012 निर्भया प्रकारणातील आरोपींना फाशी होण्याच्या एक आठवड्‌यापूर्वीच पुन्हा येथे अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी बळजबरी करून शास्त्राच्या बळावर निर्वस्त्र करून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुन्हा एक "निर्भया' वासनेला बळी पडली. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करतात.

नागपुरातील नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणारी 16 वर्षीय विद्यार्थिनी दिव्या (बदललेले नाव) हिची तिच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. त्यांच्यात नेहमी भेटीगाठी होऊ लागल्या. 21 जानेवारीला दुचाकीने दोघेही कळमना रोडवरील सूर्या टाईल्सच्या मागच्या बाजूला दुचाकी उभी करून बोलत असताना तीन अनोळखी युवक तेथे आले. येताच त्यांना धमकावले व मोबाईल हिसकावून मारहाण करणे सुरू केले. मात्र आरोपी तिथेच न थांबता त्या विद्यार्थ्याला चाकूने अडवून एकाला त्याच्याजवळ उभे केले.

पुन्हा एकदा कामठीतील "निर्भया' वासनेची बळी?
दोघांनी उभ्या दुचाकीपासून 500 मीटर अंतरावरील झाडाझुडपात नेऊन मुलीवर बलात्कार केला. विद्यार्थी मुलाला धमकावून तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने गुपचूप दोघेही घरी निघून गेले. मात्र घरी पोहोचताच मुलगी बेशुद्ध झाल्याने घरच्या मंडळींचा संशय बळावला.

 

- 14 डिसेंबरला शाळेत गेली सानिया...नंतर आली ही बातमी
 
 

दोन युवकांनी झाडाझुडपात नेऊन केला अत्याचार
धिर देऊन काही वेळाने तिची विचारपूस केली असता तिने झालेला प्रकार सांगितला. लगेच घटनास्थळ कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे माहित नसल्याने ते कळमना पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र त्यांनी घटनास्थळ कामठी हद्दीत येत असल्याचे सांगितले असता नवीन कामठी पोलिसांकडे धाव घेतली.

वैद्यकीय तपासणी मेयो हॉस्पिटलला करण्यात आली. सकाळ होताच मात्र पोलिस तपासकामी तर लागलेच पोलिस उपायुक्त निलोत्पल यांनी कामठी गाठून तपासाचे नियंत्रण आपल्याकडे घेतले. सहायक पोलिस आयुक्‍त राजरत्न बनसोड, पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे काही वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या. मात्र पोलिस आरोपींची नावे व अधिक माहिती देण्यास गुप्तता बाळगत आहेत.
 

- अशी होणार कर्जमुक्ती... वाचा काय म्हणाल्या प्रधान सचिव आभा शुक्‍ला
 

घटनास्थळी मेयो येथील प्रयोगशाळेच्या चमूने भेट दिली असून नमूने घेण्यात आले आहेत. पोलिसांनी पिडीतीच्या तक्रारीवरून एका विधीसंघर्ष आरोपीसह तिघांवर पोक्‍सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangrape in district of home minister anil deshmukh