मित्रांनो, निसर्गाशी आतातरी जुळवून घ्या, निसर्गोपचारक डॉ.बुरंगे यांचा सल्ला

file
file
Updated on


नागपूर:  निसर्ग हा माणसाचा सच्चा मित्र आहे. आपणही शेवटी त्याचे घटक आहोत. म्हणून त्याच्याशी आपण जुळवून घेणेच आपल्या हिताचे आहे. आज कोरोना विषाणूच्या संसर्गाने अख्खे जग विळख्यात सापडले आहे. त्यापासून बचावाच्या अनेक "टिप्स' निसर्गोपचारात आहेत. मात्र, आपण आपल्या जीवनात निसर्गाशी संवाद साधणे पर्यायाने आपल्याला किती वेळ देतो, हा खरा प्रश्‍न असल्याचा इशारा निसर्गोपचारक डॉ.अंकुश बुरंगे यांनी दिला.
 

सूर्यस्नान, सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय
खरे तर रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविण्याविषयी निसर्गोपचारात बरंच काही सांगितलं आहे. सूर्यस्नान, निसर्गातील अनेक गोष्टींचा आनंद घेणे, पर्यायाने नेहमी सकारात्मक राहणे आदी गोष्टींचा अंतर्भाव रोजच्या जगण्याच्या शैलीत करून घेणे आदी बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल, असा सल्ला निसर्गोपचारक डॉ. अंकुश बुरंगे यांनी दिला. आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निसर्गाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास ही संधी उपलब्ध झाली आहे. निसर्गापासून दूर जाण्यातच आजपर्यंत आपण धन्य होतो. पण प्राचीन संस्कृतीत निसर्गच्या हातात हात घालून विकास पावला आहे. निसर्गोपचारात दुसरे तिसरे काहीच करावे लागत नाही. अर्धातास सूर्यस्नान करणे, सूर्यनमस्कार घालणे, योगाप्राणायाम करणे, ध्यानधारणा करणे त्याचबरोबर स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचे सेवण करणे हमखास आरोग्यवर्धक ठरते.

माणूस ही निसर्गाची सुंदर निर्मिती
निसर्गोपचारात शिवाय काही गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखालीच केल्या जातात. परंतु, या काळात ते शक्‍य होत नसेल, तर आपण दररोज सवय पाळून स्वतःला दिवसातील काही वेळ तर देऊ शकतो. शेवटी माणूस ही निसर्गाची एक सुंदर, सुदृढ अशी निर्मिती असल्याचे डॉ.बुरंगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com