दुसऱ्या माळ्यावर खेळत होती चिमुकली, मग अचानक...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

नागपूर : घराच्या दुसऱ्या माळ्यावर खेळताना तोल जाऊन अडीच वर्षाची चिमुकली खाली पडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बेलतरोडीत उघडकीस आली. युनिका संजय तुराळे असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुराळे हे बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या हद्‌दीतील साकेतनगरीत राहतात. त्यांची अडीच वर्षीय मुलगी युनिका ही शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावर खेळत होती. खेळताना ती गॅलरीत गेली. तेथून तिचा तोल गेल्याने ती दुसऱ्या माळ्यावरून खाली पडली. डोक्‍याच्या भारावर पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

दीक्षाभूमीचा सजग प्रहरी निमाला, सदानंद फुलझेले यांचे निधन

तिला धंतोलीतील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चार तासानंतर युनिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेमुळे साकेतनगरीत हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl collapseed from second floor at nagpur