जिद्द असावी तर अशी... विजेचा दिवा अन्‌ 'ती'...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

वडिलांची मुलींना चांगले शिक्षण देण्याची अयपत नाही. घरी कमावता एकच व्यक्‍त असल्यामुळे प्रचंड बर्दंड. मात्र, कविता अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे वडिलांनी कसेबसे शिकू दिले. तिला उच्च शिक्षण देऊ शकत नाही, हे शल्य वडिलांना कायमचे सलायचे. घरी वीज नसल्याने ग्रामपंचायतीच्या विजेच्या दिव्या खाली अभ्यास करून कविताने दहावीच्या परीक्षेत 80 टक्‍के गुण घेतले. 

कामठी (जि. नागपूर) : आई-वडील शेतमजूर, घरात अळराविश्‍व दारिद्‌य असल्यामुळे साधा दिवाही नाही. हातावर आणून पानावर खाने... मुलगी मात्र अभ्यासात अतिशय हुशार... पण, तिच्या शिक्षणावर पैसे करण्याची स्थिती नाही. काहीही केल्या ते शक्‍य झाले नाही. हुशार असलेल्या मुलीला शिकवू शकत नसल्याची खंत वडिलांच्या नेहमीच मनात असूनही काहीच करू शकत नव्हते. परंतु, परिस्थितीवर मात करीत या लेकीने आपले विश्‍व निर्माण केले आहे. कविता पंढरी उईके असे या मुलीचे नाव... 

साधारणतः तेवीशीतील एका अत्यंत गरीब घरच्या मुलीची ही यशोगाथा. कामठी तालुक्‍यातील आजनी येथून गुमथळ्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसस्थानका शेजारी तिचे झोपडीवजा घर आहे. वडील शेतमजूर म्हणून अजूनही कामाला जातात. घरी पाच बहिणी, आई गृहिणी, झोपडीत विजेचे नाव नाही. यामुळे कविताने अठराविश्‍व द्रारिद्‌य कशाला म्हणतात अनुभवले आहे. 

हेही वाचा - रंगेल पतीचा पाडला मुडदा

वडिलांची मुलींना चांगले शिक्षण देण्याची अयपत नाही. घरी कमावता एकच व्यक्‍त असल्यामुळे प्रचंड बर्दंड. मात्र, कविता अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे वडिलांनी कसेबसे शिकू दिले. तिला उच्च शिक्षण देऊ शकत नाही, हे शल्य वडिलांना कायमचे सलायचे. घरी वीज नसल्याने ग्रामपंचायतीच्या विजेच्या दिव्या खाली अभ्यास करून कविताने दहावीच्या परीक्षेत 80 टक्‍के गुण घेतले. तेही कुठल्याही शिकवणीविना. यानंतर कला शाखेतून बारावी केल्यानंतर नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. आता ती शासकीय नोकरी असून, सर्वांसाठी प्रेरणा झाली आहे. 

नागपूर ऑर्डनन्स फॅक्‍टरीत नोकरीला

कविताने शासकीय सेवेत लागायची जिद्द मनात ठासून कोणत्याही मार्गदर्शनाविना स्वबळावर अनपेक्षित यश मिळविले. याद्वारे बंगळुरूच्या डीआरडीओ संस्थेत रुजू होण्याची संधी मिळाली. पण, त्यातही अनेक अडथळे होते. अखेर कविताने जबलपूरमध्येच नोकरी करण्याचा निश्‍चय केला. मात्र, प्रयत्न सुरूच होते. नागपूर ऑर्डनन्स फॅक्‍टरीत परीक्षेच्या आणि मुलाखती निघाल्यावर ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. आता ती नागपूर ऑर्डनन्स फॅक्‍टरीत नोकरीला आहे. 

आता बहिणींसाठी प्रयत्न

हिंगणा एमआयडीसीत एका कंपनीत काही काळ काम केल्यावर अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्‍टरीत शिकाऊ उमेदवारी केली. यानंतर अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, यश काही मिळाले नाही. अथक प्रयत्नानंतर ती नागपूरच्या ऑर्डनन्स फॅक्‍टरीत नोकरीला लागली असून लहान बहिणींसाठी ती प्रेरणा ठरली आहे. त्यांनाही शासकीय नोकरी मिळावी यासाठी ती प्रयत्न करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl from Nagpur got Government job