आजोबांवर रुसुन गेली घरातून निघुन, वाचा पुढे काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आजोबासोबत वाद झाल्याने 15 वर्षीय मुलगी घरून निघाली. ती रेल्वेस्थानकावर आली. विदर्भ एक्‍सप्रेसमध्ये बसली. यादरम्यान तिची भाग्यश्री, सीमा व कोडी नावाच्या तीन महिलांसोबत ओळख झाली. तिघीही मुलीला घेऊन मुंबई येथे गेल्या. त्यानंतर सात दिवसांनी सीमाने तिला यवतमाळ येथे परमेश्वर याच्या घरी आणले. त्यानंतर परमेश्वर व त्याची आई मुलीला घेऊन गुजरात येथे गेले. तेथे दीड लाख रुपये घेऊन दोघांनी मुलीला विशाल पटेल याच्या स्वाधीन केले.

नागपूर : घराच्या चार भिंतीतच मुली सुरक्षित असतात. एकदा हे सुरक्षा कवच फोडून त्या बाहेर पडल्या की त्यांच्यावर कोणता प्रसंग गुदरेल, सांगताच येत नाही. अहीच एक भयंकर घटना नुकतीच घडली. हिंगणा भागात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीची गुजरातमध्ये दीड लाख रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून हिंगणा पोलिसांनी मुलीची सुखरुप सुटका केली. परमेश्वर संभाजी कांबळे (वय 27 ), हरिदास साहेबराव धनगर (वय 42, दोन्ही रा. घारेफळ, जि. यवतमाळ), मनुजी कांतीजी ठाकोर (वय 35), जयश्री मनुजी ठाकोर (वय 27, दोन्ही रा. मेहसाना,गुजरात) व विशाल विष्णू पटेल (वय 29,रा. मेहसाना ,गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा - अपमान सहन न झाल्याने केले असे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2019 मध्ये आजोबासोबत वाद झाल्याने 15 वर्षीय मुलगी घरून निघाली. ती रेल्वेस्थानकावर आली. विदर्भ एक्‍सप्रेसमध्ये बसली. यादरम्यान तिची भाग्यश्री, सीमा व कोडी नावाच्या तीन महिलांसोबत ओळख झाली. तिघीही मुलीला घेऊन मुंबई येथे गेल्या. त्यानंतर सात दिवसांनी सीमाने तिला यवतमाळ येथे परमेश्वर याच्या घरी आणले. त्यानंतर परमेश्वर व त्याची आई मुलीला घेऊन गुजरात येथे गेले. तेथे दीड लाख रुपये घेऊन दोघांनी मुलीला विशाल पटेल याच्या स्वाधीन केले. विशाल याने धमकी देऊन वेळोवेळी मुलीवर अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांनी तिचा गर्भपात झाला. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज ओरके, जयदीप पवार, विनोद नराडे, पोलिस हवालदार विनोद कांबळे, अभय पुडके, सुजाता रायपुरे यांनी मुलीचा शोध सुरू केला. मुलगी गुजरातमधील मेहसाना येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी मुलीची सुटका करीत पाच जणांना अटक केली. मुलीला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl selling in Gujarat