सोना कितना सोना हैं...,2022 पर्यंत गाठणार हा आकडा

राजेश रामपूरकर
शुक्रवार, 26 जून 2020

अमेरिका आणि चीन तसेच भारत आणि चीनमधील तणावामुळे अस्थितरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. दुसरीकडे कोरोनाची दहशत कायम असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर दिला जात आहे. भारतीयांमध्ये पूर्वीपासून सोन्याचे आकर्षण आहे. भारतात सोन्याचे व्यवहार प्रतिदहा ग्रॅमवर ठरतात. आज सोने जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅम 50 हजार 300 रुपयांवर पोचले आहे. आगामी दोन वर्षांमध्ये सोन्याच्या दरात 60 टक्के तेजी येण्याची शक्‍यता आहे.

नागपूर :  कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानामुळे कच्चे तेल, शेअर बाजार आणि रोखे बाजारात सध्या घसरणीचा ट्रेंड चालू आहे. सोबतच जगभरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. ही परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळेच सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ चालू आहे. विश्‍लेषकांच्या अंदाजानुसार 2022 च्या मध्यंतरापर्यंत सोन्याची किंमत प्रतिदहा ग्रॅम 85 हजारांपर्यंत जाण्याची जाण्याची शक्‍यता आहे. 

अमेरिका आणि चीन तसेच भारत आणि चीनमधील तणावामुळे अस्थितरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. दुसरीकडे कोरोनाची दहशत कायम असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर दिला जात आहे. भारतीयांमध्ये पूर्वीपासून सोन्याचे आकर्षण आहे. भारतात सोन्याचे व्यवहार प्रतिदहा ग्रॅमवर ठरतात.

आज सोने जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅम 50 हजार 300 रुपयांवर पोचले आहे. आगामी दोन वर्षांमध्ये सोन्याच्या दरात 60 टक्के तेजी येण्याची शक्‍यता आहे. जागतिक बाजारांतील सध्याची स्थिती पाहता सोने गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरले आहे. कच्च्या तेलात झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याची मदत घेत असल्याचे दिसून येते. 

संतापाचा भडका : नागरिकांनी सुरक्षारक्षकाचे फाडले कपडे, कारण...
 

मागील 95 वर्षातील सोन्याचे दर 
वर्ष - दर ( प्रतिदहा ग्रॅम रुपयांमध्ये) 
1925 :  18.75 
1935 : 30.81 
1945 :  62.00 
1955 :79.18 
1965 : 71.75 
1975  : 540 
1985 : 2130 
1995 : 4680 
2005 : 7000 
2015 : 26343 
2019 : 40000 
2020 : 50,000 

गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित
जागतिक विकास दर कमी राहण्याची शक्‍यता असल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होत आहेत. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्यासाठी आज 50 हजार 300 रुपये मोजावे लागत आहेत. आठ दिवसांपूर्वी हा दर 47 हजारांवर होता. गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत असल्याने दरात वाढ होत असल्याचे दिसून येते. 
राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Likely to Rise Upto Rs. 85,000