अज्ञात हल्लेखोरांचा "कैची'वर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

रोहितला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या कंबर, पोट आणि हातावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करण्यात आले होते. हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

नागपूर : जरीपटकाच्या मायानगर परिसरात "कैची' नावाच्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाले. जखमी युवक मायानगर, गल्ली क्र. 2 निवासी रोहित उर्फ कैची नरेंद्र मोहोड (21) आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी रोहितचा भाऊ योगेशच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. 

'लुटेरी दुल्हन' प्रीती दास गजाआड होताच टोळीवर आली ही वेळ... 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास योगेशला माहिती मिळाली की, त्याचा भाऊ मायानगर परिसरात जखमी अवस्थेत पडून आहे. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि रोहितला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या कंबर, पोट आणि हातावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करण्यात आले होते. हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. जरीपटका पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goons attacked on Youth