पहिल्या परीक्षेत मारली बाजी आता महाविकास आघाडीची दुसरी परीक्षा; नागपूर जिल्ह्यात पुन्हा निवडणुकांचे वारे 

निलेश डोये
Friday, 11 December 2020

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सोबतच संबंधित ग्रामपंचायतमध्ये आचारसंहिता लागू झाली.

नागपूर: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात यशस्वी झालेल्या राज्यातील महाविकास आघाडीची आता ही दुसरी परीक्षा ठरणार आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सोबतच संबंधित ग्रामपंचायतमध्ये आचारसंहिता लागू झाली. कोरोनामुळे सरकारे निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे निवडणुका होवू न शकलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात करण्यात आली. काही ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती सहा महिन्यापेक्षा जास्त राहणार होती. 

अधिक वाचा - दोन्ही पाय गेले, हात तुटले तरीही जगतोय सन्मानाने, भीक मागून पोट भरणाऱ्यांना दाखविली नवी वाट

कायद्यात फक्त सहा महिनेच प्रशासकाची नियुक्ती करता येते. त्यामुळे कायद्यात बदल करून कार्यकाळ मर्याद करण्यात आला. ग्रामपंचायतींवर प्रशासकाच्या नियुक्तीवरूनही चांगलाच वादंग निर्माण झाला होता. सरकारने गावातील मतदाराची पालकमंत्र्याच्या सल्ल्याने प्रशासक पदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने सरकारचा निर्णय अयोग्य ठरविला. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. 

विधान परिषदेकरता निवडणूक घेण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना सोबत मतदार यादीही अंतिक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आरक्षणही निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

असा आहे कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील
छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल
नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील
१५ जानेवारी २०२१ रोजी मतदान
१८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

काटोल -- ३
नरखेड -- १७
सावनेर -- १२
कळमेश्वर -- ५
रामटेक--  ९
पारशिवनी -- १०
मौदा -- ७
कामठी -- ९
उमरेड -- १४
कुही -- २५
नागपूर (ग्रा.)--  ११
हिंगणा -- ५ 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat elections are announced in Nagpur district