video : हे आहेत ग्रामसेवक... यांची विशेषता म्हणजे लुंगी, बनियान घालून कार्यभार सांभाळणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये दररोज कुठले ना कुठले काम असते. ग्रामपंचायतमध्ये गेल्यास सर्वप्रथम अंगात लुंगी, चड्‌डी, बनियान घातलेले ग्रामसेवक दृष्टीस पडतात. ग्रामपंचायत कार्यालयातच ते नेहमी अर्धनग्न अवस्थेत झोपलेले असतात. तसे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत.

शिवनी भोंडकी (जि.नागपूर) ः देवलापार हे गाव आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून गणले जाते. याच ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत आणि राज्य शासनातील महत्त्वाचा दुवा असलेले ग्रामसेवक चक्‍क चड्‌डी, बनियान व लुंगी घालूनच कामकाज करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :1962 नंतर त्यांनी पुन्हा केले आक्रमण, पण काढावा लागला पळ...

तडकाफडकी बदली करा
नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये दररोज कुठले ना कुठले काम असते. ग्रामपंचायतमध्ये गेल्यास सर्वप्रथम अंगात लुंगी, चड्‌डी, बनियान घातलेले ग्रामसेवक दृष्टीस पडतात. ग्रामपंचायत कार्यालयातच ते नेहमी अर्धनग्न अवस्थेत झोपलेले असतात. तसे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करून त्यांची तडकाफडकी बदली करावी, अशी तक्रार संजय बेनिप्रसाद जयस्वाल, रामरतन गजभिये, शिवराम वरठी, ग्रामपंचायत सदस्य जशोदा डोंगरे यांनी केली.

हेही वाचा : दोघे सोबत आले, मिळून दारू प्याले,क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि...

कुछ नही होता, तुमको क्‍या समजता?
ग्रामपंचायत देवलापार येथील ग्रामविकास अधिकारी भारत मेश्राम हे सन 2018 पासून देवलापार येथे कार्यरत आहेत. मेश्राम हे ग्रामविकास अधिकारी असून, ग्रामपंचायत कार्यालयात नेहमी लुंगी घालून व बनियान घालून राहायचे. परंतु, ग्रामपंचायत सदस्य रामरतन गजभिये तसेच बेनिप्रसाद जयस्वाल यांनी मेश्राम यांना वेळोवेळी हटकले. पण, ग्रामविकास अधिकारी उलट "कुछ नहीं होता, तुमको क्‍या समजता हैं' असे उलटसुलट उत्तर देत असतात.

ग्रामपंचायत देवलापार येथील सदस्यांनी गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, आमदार आशीष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली. ग्रामसेवकावर लवकर कारवाई करून नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

बोलावून ताकीद देतो
मला बदली करण्याचे अधिकार नाहीत. लॉकडाउनमुळे बदली होऊ शकत नाही. मी ग्रामसेवकाला बोलावून ताकीद देतो.
-बाळासाहेब यावले
गटविकास अधिकारी, पं. स. रामटेक
 

निलंबित करण्याची मागणी करतो
मी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी करतो.
-ऍड. आशीष जयस्वाल, आमदार रामटेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gramsevaks take care of the affairs by wearing lungi and vest.