क्राईम : ‘नंदनवन'मध्ये आजोबाने केला नातीवर बलात्कार

Grandfather molestation with granddaughter
Grandfather molestation with granddaughter

नागपूर : पाहूणी म्हणून घरी आलेल्या १४ वर्षीय नातीला नराधम आजोबाने आपल्या वासनेचा बळी बनवले. तिच्यावर सलग सहा महिने बलात्कार केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) ही आठवित शिकते. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्याने ती नंदनवनमध्ये राहणाऱ्या आजीकडे राहायला आली होती. आईची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे रियाच्या आईने आजीकडे आणून सोडले होते. १४ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या रियाशी ५५ वर्षीय आजोबा हनुमान याने अश्लील चाळे केले. ती खळबडून जागी झाली. तिने आजोबाला विरोध केला. प्रतिकार झुगारून हनुमान याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी दुपारी आजी दवाखाण्यात गेली असताना हनुमानने रियाला घरात एकटे बघितले. त्याने रियाशी अश्‍लील चाळे केले. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता मारहाण केली. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आजीला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रियाने घडलेली घटना सांगितली नाही.

आजोबाने हिच संधी साधून रियावर बलात्कार करणे सुरू केले. आजोबाच्या अत्याचारामुळे रिया तणावात राहू लागली. दुसरीकडे हनुमान वारंवार रियाचे लैंगिक शोषण करीत होता. लॉकडाऊन असल्यामुळे रिया आजीकडे अडकली होती. नाईलाजास्तव रिया आजोबाचा अत्याचार सहन करीत होती.

वडिलांना पाहताच रियाने फोडला हंबरडा

आई आणि वडील १९ ऑगस्टला रियाला भेटायला आले. वडिलांना पाहताच रियाने मोठ्याने हंबरडा फोडला. वडिलांनी तिला कवेत घेतले आणि आस्थेने विचारपूस केली. रियाने आजोबाने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. वडिलांचा पारा चढला. त्यांनी पत्नीशी चर्चा करून पोलिस ठाणे गाठले.

आजोबाला अटक

रियाला अनेकदा आजोबाने मारहाण केली त्यानंतर बलात्कार केला. तिला ठार मारण्याची धमकी दिली. वडील येण्याच्या एका दिवसांपूर्वीच बलात्कार केला होता. त्यामुळे ती भेदरलेली होती. पोलिसांनी लगेच आरोपी आजोबाला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com