"हे' गवत आहे भयंकर विषारी; मात्र मोवाडवासींसाठी ठरली डोकेदुखी...

मोवाड  : ठिकठिकाणी गवताच्या वाटिकाच तयार केल्यासारखे सर्वत्र गवत उगवले आहे.
मोवाड : ठिकठिकाणी गवताच्या वाटिकाच तयार केल्यासारखे सर्वत्र गवत उगवले आहे.

मोवाड (जि.नागपूर):  गावात जणू लागवड केल्याप्रमाणे ठिकठिकाणी गवताच्या वाटिकाच तयार केल्यासारखे सर्वत्र दृश्‍य बघायला मिळते. परिश्रम घेउनही गवत किंवा झाडे उगवत नाहीत. पण आश्‍चर्य ! हे गवत कसलीही देखभाल किंवा संवर्धन केले नसले तरी सर्वत्र मोठया प्रमाणात उगवते. पण उपयोग काय? हे गवत विषारी असल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही. मोवाडवासींसाठी दरवर्षीचीच डोकेदुखी झाली असून स्थानिक न. प. प्रशासनाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

आरोग्याच्या दृष्टीने घातक गवत
गाजर गवत हे विषारी असून, या गवताच्या सान्निध्यात मोवाडवासी राहतात. या गवताच्या स्पर्शाने लोकांना खाज, गजकर्ण होते. झुडुपी गवतात वावरणाऱ्या साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून जर काही अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत येथील नगरपालिका दरवर्षी घनकचरा व्यवस्थापणासाठी लाखो रुपयांचे कंत्राट आवंटीत करीत असते. त्यात केवळ नाली सफाई, घरातील ओला, सुका व घातक कचरा तसेच संबंधित कामासाठीच इतका भरमसाट पैसा खर्च करीत असते. मात्र, दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात गावामध्ये लोकांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या गाजर गवताच्या समूळ उच्चाटनासाठीची उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याने दरवर्षी केवळ पैशांचीच उधळण होत असते काय, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

अधिक वाचा :खुद्‌द दोन पोलिस कर्मचारी अडकले जाळयात, काय केले होते त्यांनी...

संपूर्ण गावाला घातला विळखा
गावातील अनेक प्रभागांतील रिकाम्या भूखंडात, न. प.चे बालोद्यान, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दैनंदिन गाजर गवताचे जंगल वाढत असल्याने आता नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही.आधीच कोरोना संसर्गाच्या धाकाने गावकरी भयभीत अवस्थेत आहेत. अशातच गावात
निर्माण झालेल्या या गाजर गवतामुळे विविध आजार ऊद्भवण्याची यात भर पडली आहे. तेव्हा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वेळीच दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे तत्काळ लक्ष देऊन या कामी नगरपालिकेची साफसफाई यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी गावात जोर धरत आहे.
 
संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com