राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे मृत्यू नागपुरात, खाटांची संख्या वाढविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

guardian minister nitin raut order to increases beds in nagpur for corona patients
guardian minister nitin raut order to increases beds in nagpur for corona patients
Updated on

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरमध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर अधिक आहे. रुग्णांकरता तातडीने बेडची संख्या वाढविण्यात यावी, सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अन्य कोणत्याही कारणास्तव घेतलेल्या सुट्ट्या रद्द करण्यात याव्यात. आलेल्या रुग्णाला ताटकळत न ठेवता तातडीने वैद्यकीय मदत दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. 

आज दुपारी सर्वपक्षीय कोविड आढावा बैठकीनंतर पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अॅलेक्सिस हॉस्पिटल, मेयो, मेडिकल रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन अधिष्ठात्यासह रुग्णालय व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

वैद्यकीय कारणास्तव किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांची सेवा तातडीने परत घ्या, वरिष्ठ डॉक्टरांना प्रत्यक्ष इलाज करण्याच्या कामात समाविष्ट करून घ्या, प्रोफेसर व अन्य गैर वैद्यकीय कामात असलेल्या सर्व डॉक्टरांना वैद्यकीय कामे द्या, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची मदत घ्या", असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यांनी दिले. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी दररोज ३० बेड अतिरिक्त तयार होत असून मेडिकल कॉलेजमधील बेडची संख्या वाढत असल्याचे सांगितले. 

उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे लसीकरण करा - 
मेयो व मेडिकल या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे लसीकरण करण्यात यावे. कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, प्रत्येक रुग्णाचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com