हटिया-एलटीटी पूजा स्पेशल ट्रेन, नागपूरमार्गे तीन फेऱ्या

योगेश बरवड
Monday, 9 November 2020

०२८२५ हटिया- एलटीटी पूजा स्पेशल ट्रेन १४, २१ व २८ नोव्हेंबरला (प्रत्येक शनिवारी) सकाळी ९.४० वाजता हटिया येथून रवाना होईल. ही गाडी मध्यरात्री १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी दीड वाजता एसटीटी स्थानक गाठेल. 

नागपूर  ः सणासुदीमुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. परिणामी प्रतीक्षायादी लांबत आहे. प्रवासी सुविधेसाठी हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहे. ही गाडी नागपूरमार्गे एकूण तीन फेऱ्या करणार आहे.

०२८२५ हटिया- एलटीटी पूजा स्पेशल ट्रेन १४, २१ व २८ नोव्हेंबरला (प्रत्येक शनिवारी) सकाळी ९.४० वाजता हटिया येथून रवाना होईल. ही गाडी मध्यरात्री १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी दीड वाजता एसटीटी स्थानक गाठेल. 

याचप्रमाणे ०२८२६ एलटीटी- हटिया पूजा स्पेशल ट्रेन १६, २३ व ३० नोव्हेंबरला (प्रत्येक सोमवारी) मध्यरात्री १२.१५ वाजता एलटीटी येथून परतीच्या प्रवासाला निघेल. दुपारी १.४० वाजता नागपूरला पोहोचेल आणि पहाटे ४ वाजता हटिया स्थानक गाठेल. एकूण २१ डब्यांसह ही गाडी हटिया-एलटीटी स्पेशल ट्रेनच्या वेळा व संरचनेनुसार धावेल. 

हरवलेला लॅपटॉप मिळाला परत

मुंबईकर प्रवासी रविवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आला. सोबत असलेली लॅपटॉपची बॅग अनवधानाने पार्किंग परिसरातच विसरला. आरपीएफ जवानांचे लक्ष जाताच त्यांनी बॅगताब्यात घेत ठाण्यात जमा केली. सीसीटिव्ही फुटेज तपासून बॅग मालकाचा सुगावा लावला. काही वेळातच संबंधित प्रवासी आपली कैफियत घेऊन ठण्यात पोहोचला. जवानांनी त्याच वेळी बॅग हातात ठेवून प्रवाशाला आश्चर्याचा धक्का दिला. रमेश मेश्राम (४२) रा. खारघर, नवी मुंबई असे बॅग परत मिळालेल्या प्रवाशाचे नाव आहे. रेल्वेच्या आगळ्यावेगळ्या विश्वात सारेच हरवून जातात. सर्वत्र गर्दीच असली तरी प्रत्येक जण स्वतःला गर्दीपासून अलिप्त दर्शवितो. सोबत असणाऱ्या सामानाकडे थोडेही दुर्लक्ष झाले की ते पुन्हा मिळणे कठीण. पण. मुंबईकर मेश्राम मात्र नशिबवान ठरले. रविवारी सकाळी ते नागपूर स्टेशनवर पोहोचले. स्टेशनबाहेरील पार्किंग परिसरात काही वेळ थांबले. यादरम्यान बॅग विसरून पुढे निघून गेले. इकडे आरपीएफ जवान अजय सिंह यांना ही बॅग बेवारस अवस्थेत आढळली. लागलीच उपनिरीक्ष विनोद खरमाटे यांना माहिती देत बॅग जमा करून घेतली. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatia LTT Pooja Special Train via Nagpur