esakal | यांचाही होतो वाढदिवस...
sakal

बोलून बातमी शोधा

He Also Has Celebrate Birthday...

सामाजिक वनीकरणाच्या पुढाकाराने गेल्यावर्षीच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या रोपवणात वृक्षलागवड करण्यात आली होती. गोधनी रेल्वेच्या परिसरात 12 हजार 500 रोपे लावण्यात आली होती. त्यातील 90 टक्के रोपे जिवंत असून त्यात कडुनिंब, शिसू, करंज, सेमल, सप्तपर्णी व करंज पिंपळ, मोहा व बेल रोपांची उत्तम वाढ झाली आहे. रोपांची सर्वसाधारण उंची 4 ते 5 फूट आहे. 

यांचाही होतो वाढदिवस...

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर :  आप्त व मित्र परिवारांचे वाढदिवस साजरी करण्याची परंपरा जूनीच. पण हा वाढदिवस जरा हटकेच होता, साजऱ्या झालेल्या या वाढदिवसाला फुगे, संगीत, केक नव्हता मात्र, पारंपारिक पद्धतीने रोपवनातील बेलाच्या वृक्षाचे विधिवत पूजन करुन वाढदिवस साजरा करताना समाजापुढे "झाडे लावा, झाडे जगवा'च्या माध्यमातून सुंदर उदाहरण प्रस्तृत केले. स्थळ होते सामाजिक वनीकरणाच्या नागपूर परिक्षेत्रातील गोधनी रेल्वे. 

सामाजिक वनीकरणाच्या पुढाकाराने गेल्यावर्षीच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या रोपवणात वृक्षलागवड करण्यात आली होती. गोधनी रेल्वेच्या परिसरात 12 हजार 500 रोपे लावण्यात आली होती. त्यातील 90 टक्के रोपे जिवंत असून त्यात कडुनिंब, शिसू, करंज, सेमल, सप्तपर्णी व करंज पिंपळ, मोहा व बेल रोपांची उत्तम वाढ झाली आहे. रोपांची सर्वसाधारण उंची 4 ते 5 फूट आहे. 

महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करताना सामाजिक अंतरासह मास्क लावून अत्यंत साधेपणाने वृक्षारोपणाचा पहिला आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी गीता ननावरे, डब्ल्यू डब्ल्यू एफ इंडियाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्‍य भटकर, रोबिंन हूड आर्मीचे विनय ठाकरे, पीपल्स फॉर ×निमलचे आशिष कोहळे, श्री स्वप्नील बोधाने उपस्थित होते. रोपवन यशस्वी करण्याकरिता वन परिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते, वनरक्षक कैलास सानप यांच्या परिश्रमामुळे रोपवन यशस्वी झाले आहे.