पिस्तुलाच्या धाकावर तो मागायचा खंडणी; अखेर जेरबंद

gun
gun

नागपूर  : एका मेडिकल स्टोअरच्या संचालकाचे अपहरण करून पिस्तुलाच्या धाकावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड राकेश वासुदेव डेकाटे (रा. उज्वल नगर, सोनेगाव) याला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी सचिन नंदकुमार बडजाते यांचे प्रतापनगरात मेडिकल स्टोअर्स आहे. जून ते नोव्हेंबर २०१४ दरम्यान सचिन यांनी कुख्यात राकेश डेकाटेकडून एक कोटी १८ लाख रुपये उधार घेतले होते. त्याबदल्यात पुढच्या तीन वर्षात डेकाटे याने त्यांच्याकडून एक कोटी ८० लाख रुपये वसूल केले. त्यानंतरही अधिक रक्कम पाहिजे म्हणून तो सचिन  आणि त्यांचे बंधू श्रेयांश बडजाते यांना धमकावत होता.

सविस्तर वाचा - मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झाली ही माऊली म्हणते                                                                                            अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देत होता. ३० ऑक्टोबर २०१९ ला आरोपी राकेश डेकाटेने रिवाल्वरच्या धाकावर श्रेयांश बडजाते यांचे अपहरण केले. त्यांना गोळी मारून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. सचिनने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राकेश डेकाटे विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच डेकाटे फरार झाला होता. त्याला आज पोलिसांनी अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com