आरोग्यपथके पोहोचली गाव, पाडे, तांडे, वस्त्यात...

सतीश डहाट/मनोहर घोळसे
Sunday, 27 September 2020

ग्रामीण भागात आरोग्य नियंत्रणासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवीत असूनही बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे या अभियानाला आरोग्य विभाग पंचायत समिती प्रशासन ग्रामपंचायत स्थानिक पदाधिकारी व गावातील सुजाण नागरिकांच्या सहकार्याने प्रभावशाली राबविण्यासाठी अधिक भर दिला जात असल्याचे पंचायत समितीचे अधिकारी सांगतात.

सावनेर (जि.नागपूर) :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या जनजागृती मोहिमेला सर्वत्र राबविले जात आहे. या अनुषंगाने तालुक्यातील गावागावांमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. या मोहिमेसाठी आरोग्य पथके गाव, पाडे, तांडे आधी वस्त्यांमधील प्रत्येकांची आरोग्य तपासणी व जनजागृतीसाठी घरोघरी पोहोचत आहेत.

ग्रामीण भागात आरोग्य नियंत्रणासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवीत असूनही बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे या अभियानाला आरोग्य विभाग पंचायत समिती प्रशासन ग्रामपंचायत स्थानिक पदाधिकारी व गावातील सुजाण नागरिकांच्या सहकार्याने प्रभावशाली राबविण्यासाठी अधिक भर दिला जात असल्याचे पंचायत समितीचे अधिकारी सांगतात.

अधिक वाचाः कोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारासाठी शुल्क वसुली, नातेवाईकांची ऐनवेळी पैशासाठी धावाधाव
 

या मोहिमेत आरोग्यपथक करणार हे-
-घरातील प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद घेणे.
-इन्फ्रारेड थर्मामीटरने घरातील सर्वांच्या शरीरातील तापमान मोजणे.
-प्लस ऑक्सी मीटरने शरीरातील ऑक्सिजन पातळीची नोंद घेणे.
-ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची सदृश्य लक्षणे जाणवल्यास त्याचीही नोंद शासन यंत्रणेने ठेवणे.
-याशिवाय घरातील मधुमेह ,हृदयरोग ,कर्करोग, किडनी आजार, अवयव व प्रत्यारोपण तसेच आदी आजारांची माहिती घेणार.
-तापमान १००.४ ° F पेक्षा जास्त ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आणि कोणतीही कोमँरबिडीटी असल्यास नागरिकांनी न घाबरता टेस्ट करण्याचे आवाहन.

अधिक वाचाः मुलानेच संपविले जन्मदात्याचे आयुष्य
 

कढोली येथे सरपंचांचा पुढाकार
कामठीः ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा. याबाबत सविस्तर माहिती १६ तारखेपासून तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमार्फत सरपंच प्रांजल वाघ चमूसह प्रत्येक घरोघरी सर्वेक्षण करुन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. कोविडची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या केअर सेंटरमध्ये उपचाराची सोय करण्यास बाधित रुग्णास मदत करणार आहेत. त्यांच्या मदतीला आलेल्या सारिका सहारे, मीनाक्षी वाघ, मनीषा वानखेडे, दुर्गा वाघ, दुर्गा कडू, आरती घुले, अलका निकाळजे आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health teams reached villages, pades, tandas, settlements ...