होमिओपॅथीत आहे कोरोनावर औषध? साथीच्या रोगांसाठी प्रभावी उपचारपद्धती

There will be medicine for corona in Homeopathy
There will be medicine for corona in Homeopathy

नागपूर : कोरोनावर आजपर्यंत लस उपलब्ध होऊ शकला नाही. येत्या 2021 पर्यंत कोरोना नियंत्रणावरील लस येऊ शकते. परंतु यापुर्वीच कोरोनाच्या लक्षणानुसार होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रभावी उपचारपद्धती ठरु शकते. आयुषच्या माध्यमातून संशोधन करून "कोरोनियम' अशी होमिओपॅथ औषधी तयार होऊ शकते, यासाठी
आयुष मंत्रालयाने कोरोना (कोविड-19) वर होमिओपॅथी शाखेतील उपचारांच्या संशोधनाला गती देण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संजय तांबे यांनी व्यक्त केले. विशेष असे की, यापुर्वी होमिओपॅथी औषध निर्मितीच्या प्रक्रियेतून अशाप्रकारच्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी औषधं तयार करण्यात आली आहेत.
कोरोना विषाणू हा नवीन आहे. या विषाणूचा थेट परिणाम फुफ्फुसावर होतो. या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात अद्याप ऍन्टिबॉडिज तयार करण्यासाठी संशोधन सुरू झाले आहे. सद्या जगात अमेरिका, इंग्लड, चीन, आस्ट्रेलिया, इस्त्राईलपासून तर भारतामध्येही लसनिर्मितीवर संशोधन सुरू आहे. मात्र याला उशीर लागणार आहे. त्यापुर्वी कोरोना विषाणूपासूनच संशोधनातून "कोरोनियम' या नावाने औषध तयार होऊ शकते, असा दावा डॉ. तांबे यांनी केला आहे. ऍलोपॅथी येण्यापुर्वी यापुर्वी 1895 मध्ये "घटसर्प' (डिप्थेनियम) हे औषध घशातील स्त्रांवापासून तयार करण्यात आले. 1831-32 मध्ये मोठी माताची साथ आली त्यावेळी "प्युफरमेंट', कॅम्फर ही होमिओपॅथीची औषध तयार करून साथ नियंत्रणात आणण्याचा इतिहास होमिओपॅथीच्या नावावर आहे. "टीबी' वरील ट्युबरक्‍लोनम हे औषधही याचप्रकारे नोसाडा या होमिओपॅथी औषध तयार करण्याच्या संशोधन प्रक्रियेतून पुढे आले आहे. या आणिबाणीच्या काळात कोरोनाला हरवण्यासाठी होमिओपॅथी औषध गुणकारी ठरत असल्याने सद्या देशात "अर्सेनिक अल्बम' या होमिओपॅथी औषधाच्या वापरातून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होमिओपॅथिक "सम समम शमयती' अर्थात ज्या गोष्टीपासून त्रास होतो, तीच वस्तू या रोगाला बरे करु शकते, हाच या पॅथीच्या तत्वाचा सिद्धांत आहे. दिल्लीत डेंगीची साथ आल्यानंतर 29हजार 500 लोकांना डेंगीचा डंख बसला होता, त्यावेळी नोसोड अर्थात होमिओपॅथी औषध तयार करण्याच्या प्रक्रियेतून औषधोपचार केला आणि 23 हजार 500 डेंगीग्रस्त बरे झाल्याची नोंद आहे.

होमिओपॅथीच्या मदतीने या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करता येऊ शकतो. सद्या आर्सेनिक अल्बम हे औषध घेतले तर या विषाणूचा संसर्ग आटोक्‍यात येतो. यामुळेच सर्व कोविड योद्धे या औषधाचा वापर करीत आहेत. इन्फ्लुएंझावरही हेच औषध चांगले परिणामकारक आहे. सोबतच व्यक्तिगत स्वच्छता पाळणे गरजेचे असून साबणाने हात वीस सेकंद धुणे गरजेचे आहे. आजारी व्यक्तींशी संपर्क टाळणे आवश्‍यक आहे. कोरोनाची शंका असल्यास मास्क लावून थेट जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

-डॉ. संजय तांबे, जेष्ठ होमिओपॅथ तज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com