नागपुरात गुन्हेगार सुसाट ; युवकाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020


नागपुरातील गुन्हेगाराना कायद्याचा धाक वाटेनासा झाला आहे. शहरात दररोज गंभीर गुन्हे घडत आहे. खून, अपहरण सारख्या घटना आता जणू सामान्या झाल्या आहेत. दोन गुंडांनी एका युवकाचे अपहरण करून त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर: दोन गुंडानी एका युवकाचे अपहरण केले. त्याला शांतीनगरातील एका पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तेथे युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची थरारक घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश भगवानी वय 20 रा तुळशिनगर हा किराणा व्यापारी आहे. आज रविवारी सकाळच्या सुमारास भावेश हा मित्रलोक तुलानी नावाच्या युवकासोबत छापरूनगरातील मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. दरम्यान आरोपी सागर यादव आणि रजत राऊत याने भावेशला रोखले आणि दुचाकीवरुन अपहरण करून ईतवारी रेल्वे स्टेशन परिसरात नेले.
वाचा- आयुक्त तुकाराम मुंढेंवरून महापालिकेत हा पक्ष गोंधळात
तेथे त्याला मारहाण करून पैशाची मागणी करण्यात आली. भावेश याने एका मित्राला फोन करून पैशाची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र यादरम्यान दोन्ही आरोपींनी भावेश याला शांती नगरातील एका पेट्रोल पंपवर नेले आणि त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले. सुदैवाने यादरम्यान काही नागरिकांनी धाव घेतल्यामुळे भावेशचा जीव वाचला. शांतीनगर पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hooligan pour petrol on Youth, Try to set ablaze