लॉकडाउनमध्येही मेट्रोच्या कामाचा वेग कसा होता कायम? वाचा सविस्तर

How was Metro maintained work in the lockdown?
How was Metro maintained work in the lockdown?
Updated on

नागपूर : मार्चपासून मेट्रोची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी कामाचा वेग मात्र कायम ठेवल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमध्येही महामेट्रोने आवश्यक तसेच शक्य ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला. परिणामी वर्धा मार्गावरील अजनी व रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनचे काम संपुष्टात आले. एवढेच नव्हे, तर हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले असून प्रवासी वाहतूक सुरू होताच या स्टेशनवरूनही नागरिकांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लॉकडाउनच्या काळात शक्य ती कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिला. लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी असल्याने मजुरांचा अभाव असतानाही अनेक कामे करण्यात आली. त्यामुळेच आज वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्टेशनचे काम संपुष्टात आले.

रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन परिसरात अनेक डेरेदार हिरवेगार वृक्ष आहेत. मेट्रो ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचा परिसर वृक्षवेलींनी नटलेला असून येथून प्रवास करताना जंगलावून प्रवास केल्याचा आभास होतो. यामुळे स्टेशनला ‘ग्रीन लूक’ देण्यात आले आहे. या मेट्रो स्थानकाच्या आसपास आयटीआय, अंधविद्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, मध्यवर्ती कारागृह, इतर शासकीय तसेच सार्वजनिक कार्यालये आहेत.

अजनी स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून येथे बाजूलाच असलेल्या रेल्वे स्टेशन असल्याने या स्टेशनचेही महत्त्व आहे. मुंबईवरून येणाऱ्या रेल्वे अजनी रेल्वे स्टेशनला थांबतात. येणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी अजनी मेट्रो स्टेशनवरून मेट्रोत बसता येणार आहे. हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले आहे.

या मार्गावरील लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशन यापूर्वीच सुरू झाले आहेत. बंसीनगर स्टेशनची उभारणी ५८०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली आहे. स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूला आत जाण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तीन मजली स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

 
प्रजापतीनगरपर्यंतच्या १० किमी ट्रॅकचे काम पूर्ण
सीताबर्डी ते पूर्व नागपुरातील प्रजापतीनगर मेट्रो ट्रॅकचे काम जलदगतीने सुरू आहे. या मार्गावरील १०.०० किमी ट्रॅकचे काम पूर्ण झाले. या मार्गिकेवर महामेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा उड्डाणपूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात येत आहे. आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत या पुलाचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गावरील व्हायडक्टचे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com