`जनता कर्फ्यू'नंतर नागपूरकरांचा कसा लागणार कस? वाचा

How will Nagpurkars face challenge after 'Janata Curfew'?
How will Nagpurkars face challenge after 'Janata Curfew'?

नागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवाहन केलेल्या "जनता कर्फ्यू'ला नागपूरकरांनी दुसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद दिला. सकाळी दूध, किराणा, औषधी दुकानांचा अपवाद वगळता सर्वच दुकाने बंद स्वयंस्फूर्तीने होती. अनेक नागरिक घरांमध्येच असल्याने रस्त्यावर क्वचितच वाहने दिसून आले.

दरम्यान, 27 ते 30 जुलैपर्यंत लोकप्रतिनिधी नागरिकांना कोरोना संदर्भातील नियमाचे पालन करण्याबाबत जनजागृती करणार आहे. या चार दिवसांत नागपूरकरांनी संयम दाखविला तरच लॉकडाऊन टाळता येणार आहे. त्यामुळे उद्यापासून नागपूरकरांचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. 

शहरात दररोज दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 3800 पर्यंत पोहोचली. कोरोना बळीसंख्याही शतकाच्या जवळ येऊन ठेपली आहे. महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी जनता कर्फ्यूची घोषणा करीत नागपूरकरांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार काल, जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नागपूरकरांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. आज सकाळपासूनही नागरिकांनी विरंगुळ्यासाठी घराबाहेर निघण्याचे टाळले. अत्यावश्‍यक कामासाठीच नागरिक घराबाहेर निघाले. एका घरातून एकच जण बाहेर पडला. मात्र, अकरा वाजतानंतर रस्ते पुन्हा सुनसान झाले. रविवारीही काही कार्यालये सुरू असल्याने तेवढीच नागरिक कार्यालयात जाताना दिसले.

त्यामुळे रस्त्यांवर वाहनेही बोटावर मोजण्याइतपत होती. वाहनचालक मास्कसह दिसल्याने नागरिक नियम पालनाबाबत गंभीर झाल्याचे दिसून आले. रविवार असूनही शहरातील सक्करदरा बुधवार बाजार, म्हाळगीनगरसह विविध भागातील भाजी बाजार बंद होते. त्यामुळे बाजाराचा संपूर्ण परिसर ओसाड दिवसून आला.

जनता कर्फ्यूमुळे बडकस चौक, महाल, कोतवाली, इतवारी, सिताबर्डी, सदर, इंदोरा, सक्करदरा, गिट्टीखदान, धरमपेठ, गोकुळपेठ येथील बाजारपेठा बंद होत्या. शहरातील सर्वच भाजीबाजारही बंद होते. एकूणच नागपूरकर नागरिक व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करीत लॉकडाऊन टाळण्यासाठी पुढाकार घेतला. 


 
लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी ही "लिटमस टेस्ट' होती. यात नागपूरकर पास झाले. लॉकडाऊन हा पर्याय नाही, हे नागपूरकरांनी दाखवून दिले. त्यामुळे पुढील चार दिवसांत नागपूरकरांनी दोन दिवसातील जीवनशैलीचाच अंगिकार करावा. सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर करावा. 
संदीप जोशी, महापौर. 

दोन दिवसांत नागपूरकरांनी अंगिकारलेल्या जीवनशैलीवर भविष्यातही अंमल करावा. जनता कर्फ्यूनंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करू नये. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी असलेल्या नियमाचे पालन केल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही. लक्षणे आढळल्यास दवाखान्यात चाचणी करून घ्यावी. 
तुकाराम मुंढे, आयुक्त. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com