कोरोनाच्या संक्रमणातही विद्यापीठात कसे येणार कर्मचारी ?

मंगेश गोमासे
Sunday, 20 September 2020

कोरोनामुळे राज्यात मार्चमध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आली. यामुळे केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे विद्यापीठात केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार विद्यापीठांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले.

नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पूर्ण कर्मचाऱ्यांसह विद्यापीठांना काम करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विद्यापीठातील आस्थापनेवर असलेले आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहावे लागणार आहे. मात्र, विद्यापीठात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनामुळे राज्यात मार्चमध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आली. यामुळे केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे विद्यापीठात केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार विद्यापीठांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले.

महिलांसाठी आनंदाची बातमी : प्रसूतीवेदना कमी करण्यासह सुरक्षित प्रसूतीसाठी सहायक उपकरणाची निर्मिती; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संशोधन

मात्र, विद्यापीठात १० टक्के कर्मचाऱ्यांवर परीक्षा विभागाचे काम कसे काय? चालणार हा प्रश्न असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आता विद्यापीठांना पूर्ण कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (ता. २१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आदेश काढून कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येणार आहे. दुसरीकडे विद्यापीठात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. परीक्षा विभाग असो वा सामान्य प्रशासन या सर्वच विभागातील कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यानंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठात पूर्ण कर्मचाऱ्यांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहे हे विशेष.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार विद्यापीठाचे कर्मचारी
जिल्हाधिकारी कार्यालयांद्वारे विद्यापीठातील २०० कर्मचारी कोरोना कामासाठी घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठातील १० टक्क्यातीलही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. आता परीक्षेचे दिवस असल्याने विभागाच्या आदेशाचा आधार घेत हे सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांना परत विद्यापीठ परत मागणार आहेत.

४६२ च्या कर्मचाऱ्यांना काढणार
विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ४६२ नुसार कामावर घेण्यात येते. मात्र, सध्या कोरोना असल्याने ५० पेक्षा अधिक वय असलेल्यांना कामावर बोलावू नये असा नियम असल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठात किमान ८० सेवानिवृत्त कर्मचारी कामावर आहेत. मात्र, ज्या ठिकाणी अत्यावश्यक गरज असल्यास, त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will the staff come to the university even in the corona transition?