बातमी मागची बातमी! उपमुख्यमंत्र्यांसमोरच भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; वाचा काय आहे प्रकार

राजेश चरपे
Tuesday, 9 February 2021

जिल्ह्याला ८५० कोटी रुपये द्यावे, ३६५ कोटींच्या अखर्चित निधीला मुदतवाढ द्यावी, सर्व आमदारांना विश्वासात घेऊन निधी वाटप करावा आदी मागण्या केल्या जात होत्या. या दरम्यान प्रकाश गजभिये कार्यकर्ते घेऊन आयुक्तालयात आले.

नागपूर : जिल्हा नियोजन समितीचा ८५० कोटींचा निधी पूर्ण द्या. तसेच अखर्चिक निधीला मुदतवाढ द्यावी यासाठी भाजपचे नेते आंदोलन करीत असताना माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने केंद्र सरकारने जीएसटीचे २८ हजार कोटी द्यावेत, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच दोन्ही पक्षांत घोषणाबाजींचे युद्ध रंगल्याने विभागीय आयुक्तालय परिसर दणाणून गेला होता.

अजित पवार यांची विभागीय आयुक्तालयात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे आमदार समीर मेघे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात घोषणा करण्यात येत होत्या.

अधिक माहितीसाठी - सावधान! मुली पळवणारी टोळी सक्रिय; पारशिवनी तालुक्यात घडताहेत एकापाठोपाठ घटना

जिल्ह्याला ८५० कोटी रुपये द्यावे, ३६५ कोटींच्या अखर्चित निधीला मुदतवाढ द्यावी, सर्व आमदारांना विश्वासात घेऊन निधी वाटप करावा आदी मागण्या केल्या जात होत्या. या दरम्यान प्रकाश गजभिये कार्यकर्ते घेऊन आयुक्तालयात आले. त्यांनी केंद्राने जीएसटीचे पैसे आधी द्यावे, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावे यासाठी घोषणाबाजी केली.

याचे उत्तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांकडे केली. त्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला होता. नगरसेवक दुनेशर पेठे, महेंद्र भांगे, विजय गजभिये, हाजी आसिफ भाई, गोपी आंबोरे, बदल शेंद्रे, अमित मुडेवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाणून घ्या - मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा इतिहास आणि घडली अनुचित घटना

बैठक मुंबईत घेऊ
भाजपच्या लोकांनी आंदोलन करून निवेदन दिले. विकासकामे थांबवल्याची त्यांची तक्रार आहे. यासंबंधात सर्व अधिकारी व आमदारांची बैठक मुंबईत घेऊ.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge announcement from BJP and NCP for funds Nagpur political news