esakal | पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..  
sakal

बोलून बातमी शोधा

Husband demands for money to wife she filed FIR against him

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटी नोकरीवर असलेल्या युवकाचे आणि नागपुरातील बजाजनगर येथे राहणाऱ्या महिलेचे शादी डॉट कॉमवरून लग्न जुळले. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसातच या महिलेला पती विचित्र मागणी करू लागला.

पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..  

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर: आजकालच्या मॉडर्न युगात ऑनलाइन विवाहस्थळांची संख्या वाढत चालली आहे. विवाह करू इच्छिणारे वर वधू या संकेतस्थळांवर स्वतःचे प्रोफाइल बनवून एकमेकांबद्दल संपूर्ण माहिती घेतात. या सुविधेमुळे अनेकांची लग्नही होतात आणि त्यांचा संसार सुखी असतो. मात्र या ऑनलाइन लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळांवर असलेल्या सर्व प्रोफाइल खऱ्या असतीलच असे नाही.       

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटीत नोकरीवर असलेल्या युवकाचे आणि नागपुरातील बजाजनगर येथे राहणाऱ्या महिलेचे शादी डॉट कॉमवरून लग्न जुळले. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसातच या महिलेला पती विचित्र मागणी करू लागला. वारंवार नकार देऊनही पतीने ही मागणी सुरूच ठेवली. अखेर पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पण नक्की काय घडलं जाणून घ्या. 

क्लिक करा -  नागपुरात डबल मर्डरचा थरार! पत्नीच्या अनैतिक संबंधावरून झाला वाद.. अखेर त्याने हाती घेतली कुऱ्हाड आणि...

पतीसाठी सोडली गलेलठ्‌ठ पगाराची नोकरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अपूर्णा जोशी (28, रा. निरी कॉलनी, बजाजनगर) ही केमीकल इंजिनिअर असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीवर होती. लग्नासाठी अपूर्णाने शादी डॉट कॉमवर प्रोफाईल तयार केले होते. तिच्या प्रोफाईलला मॅच होणारा स्वयम संजीव जोशी (रा. यवतमाळ) याने तिला फोन केला. फोनवरून बोलणी झाली आणि पुढील कार्यक्रम ठरले. दोघांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेतल्या. दोघेही 2 सप्टेबर 2018 पासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांशी बोलणी करून लग्नाची तारीख ठरविण्यात आली. आरोपी स्वयंम जोशी याने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात विद्यापिठात प्राध्यापक असल्याचे सांगितले होते. तीच माहिती त्याने शादी डॉट कॉमवर ठेवलेल्या प्रोफाईलमध्येसुद्धा लिहिली होती. उच्चशिक्षित तरूणाशी लग्न होत असल्यामुळे अपूर्णा खूश होती. पुण्यातील गलेलठ्‌ठ पगाराची नोकरी अपूर्णाने सोडली आणि स्वयंमशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सासरच्यांनी केला छळ 

स्वयम आणि अपूर्णाचे मोठ्या धुमधडाक्‍यात लग्न झाले. अपूर्णा सासरी यवतमाळ येथे राहायला गेली. अपूर्णाने लग्न समारंभ आणि महागड्या वस्तू भेट देण्यासाठी जवळपास 25 लाख रूपये पती स्वयम जोशी याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर खर्च केले. मात्र यवतमाळमध्ये सासरी राहत असताना सासू अर्चना संजीव जोशी (वय 54) आणि नणंद सेजल संजीव जोशी (वय 25) यांनी अपूर्णाला टोमणे मारणे सुरू केले. डायमंड रिंग, कार आणि नेकलेस माहेरून आणण्यासाठी अपूर्णाचा मानसिक व शारीरिक छळ केला. 

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

बनवली होती बनावट प्रोफाइल 

पती स्वयमचेही पितळ उघडे पडले. बनावट प्रोफाईल दाखवून केमीकल इंजिनिअर असलेल्या युवतीशी लग्न केले. लग्नानंतर तिला गिफ्ट म्हणून कार, डायमंड रिंग अशा महागड्या वस्तूंची मागणी केली. तिला पती, सासू आणि ननंदेने मारहाण करीत घराबाहेर काढण्याची धमकी दिली. वारंवार पैशाची मागणी करीत मारहाण करीत असल्यामुळे कंटाळलेली अपूर्णा माहेरी नागपुरात आली. आईवडीलांना सासरच्या मंडळीकडून होणारा छळ सांगितला. या प्रकाराला कंटाळलेल्या विवाहितेने बजाजनगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

संपादन - अथर्व महांकाळ