स्पर्धा स्थगित तरीही मालविकाला चिंता नाही...

नरेंद्र चोरे
Wednesday, 16 September 2020

स्पर्धा स्थगित झाली असली तरी निराश न होता, उलट पुढच्या वेळी मी आणखी जोमाने तयारी करेल, अशा शब्दांत नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने सध्याच्या स्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

नागपूर : उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यापासून मी जोमाने प्रॅक्टिस करीत आहे. तयारी अपेक्षेप्रमाणे छान सुरू आहे. कोरोनामुळे काही देशांनी माघार घेतल्याने ही स्पर्धा स्थगित झाली आहे.

स्पर्धा स्थगित झाली असली तरी निराश न होता, उलट पुढच्या वेळी मी आणखी जोमाने तयारी करेल, अशा शब्दांत नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने सध्याच्या स्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान अरहस (डेन्मार्क) येथे होणाऱ्या महिलांच्या उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी १९ वर्षीय मालविकाची भारतीय संघात निवड करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे इंडोनेशियासह आघाडीच्या सहा देशांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. शिवाय आणखी काही देश स्पर्धेतून अंग काढून घेण्याचा विचार करीत आहेत. या परिस्थितीत ही स्पर्धा पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

वाचा - सकाळच्या वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी खेळाडूंना कोणता दिला सल्ला… वाचा सविस्तर

 

स्पर्धा स्थगित झाल्याने मालविकासह अनेकांची डेन्मार्कवारी हुकली आहे.
मालविका म्हणाली, उबेर कप मोठी व प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे एवढ्या कमी वयात मला संधी देणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची गोष्ट आहे. स्पर्धेच्या निमित्ताने मला साईना व सिंधूसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची प्रथमच संधी मिळत आहे. त्यामुळे मी स्पर्धेबद्दल खूपच उत्सूक आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षक संजय मिश्रा सरांच्या मार्गदर्शनात कसून सराव करीत आहे. स्पर्धा झाली असली तरी तरीदेखील दुःख मानण्याचे काहीएक कारण नाही.

आणखी वाचा - अरे हे चाललंय काय? कोरोनाच्या भीतीचा डॉक्‍टरांकडून धंदा! एकच चाचणी, तीन डॉक्‍टर, वेगवेगळे दर

 

मी या घटनेला सकारात्मक दृष्टीनेच घेणार आहे. यामुळे मला तयारीसाठी आणखी वेळ मिळणार आहे. या कालावधीत मी माझ्या खेळात सुधारणा करण्यावर निश्चितच भर देणार आहे. मी पहिल्यांदाच सिनियर गटात खेळत आहे. माझ्याकडे अजून खूप वर्षे शिल्लक आहेत. भविष्यात अशा अनेक संधी मिळणार आहेत. त्यामुळे नाउमेद होण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे विनाकारण चिंता न करता आता पुढील स्पर्धेची तयारी करणार असल्याचे मालविकाने सांगितले.  

संपादन - नरेश शेळके

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Will get Additional time for preparation