इग्नूचाही प्रादेशिक भाषांवर भर, या भाषेच्या चित्रफितींचे काम पूर्ण...

IGNOU will provide education in Marathi
IGNOU will provide education in Marathi

नागपूर  : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने "स्वयम शिक्षा पोर्टल'वर विविध अभ्यासक्रमांसाठी स्थानिक भाषांमधील चित्रफीत तयार करण्यात आहे. यामध्ये मराठीचा समावेश करण्यात येणार असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) राष्ट्रीय समन्वयकाचे काम बघत आहे. इग्नूच्या नागपूर विभागीय कार्यालयाला अन्य भाषांमधील चित्रफितीचे मराठीत भाषांतरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जवळपास काम पूर्ण झाले असून, हे सर्व व्हिडिओ क्‍लिप मंत्रालयात पाठविण्यात येत असून त्यानंतर या "स्वयम' पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. सध्या बऱ्याचशा "क्‍लिप' "यू-ट्यूब'च्या प्रादेशिक चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

"स्वयम'साठी 8 भारतीय भाषांची निवड करण्यात आली., यात मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि बंगाली भाषेचा समावेश आहे. या सर्व भाषांमध्ये विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची चित्रफीत तयार करण्यात येत आहे. यात मराठी भाषेची चित्रफीत तयार करण्याची जबाबदारी ही नागपूर विभागीय केंद्राला देण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई येथील केंद्राच्या सहकार्याने नागपूर केंद्रावरून हे काम सुरू राहणार आहे. आतापर्यंत 170 तज्ज्ञांनी भाषांतरासाठी नोंदणी केली आहे.


ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून त्यांना कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये शिक्षणाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने ऑनलाइन माध्यमांचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे. इग्नूनेही यामध्ये पुढाकार घेतला असून सध्या ज्ञानवानी, फेसबुक, गुगल वर्ग आदी माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ई-मेलच्या माध्यमातून प्रकल्प संकलित करण्यात आले आहे. टाळेबंदीमुळे प्रकल्प आणि परीक्षेचे शुल्क जमा करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर विविध अभ्यासक्रमांचे शोधप्रबंध जमा करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 
ग्रामपंचायतीच्या मदतीने डिजिटल शिक्षण
संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आल्याने शिक्षणासाठी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर होत आहे. मात्र, इग्नूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कठीण जाणार आहे. त्यामुळे अशा भागातील केंद्रांमधून रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पर्यायही निवडला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com