मोबाईल एज्युकेशन मुलांसाठी ठरतेय घातक, वाचा कसे काय?

Increasing visual impairment in children
Increasing visual impairment in children

नागपूर  : राज्यभरात टाळेबंदी असल्याने केंद्रासह राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे बाहेर जाता येत नसल्याने सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीच्या सान्निध्यात चिमुकल्यांसह दहावी ते बारावीचे विद्यार्थी येत असल्याने मुलांमध्ये दृष्टिदोषाचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे कोरडे होणे, चष्मा असणाऱ्यांचा नंबर वाढणे यासारख्या समस्या उद्‌भवत आहेत.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. करण्यात आले. त्यामुळे या दरम्यान विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची ओढ कायम राहावी यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दिशानिर्देश देण्यात आले. यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत अभ्यासमाला सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाने केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून गाव आणि तालुकास्तरावर पालकांचे "व्हॉट्‌सऍप' ग्रुप तयार केले.

 याशिवाय शिकवणी वर्गाच्या माध्यमातून जेईई मेन, नीट, एमएचटीसीईटी आणि इतर प्रवेश पात्रता परीक्षांचे ऑनलाइन वर्ग सुरू केले. यामुळे पहिल्या वर्गापासून तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी सतत सहा ते आठ तास मोबाईल, कॉम्प्युटरसमोर तर यानंतर टाईमपास करण्यासाठी टीव्हीसमोर बसल्याचे चित्र आहे.

पालकही मुलांकडून मोबाईलच्या वापर करण्यावर कुठलीही बंधने टाकत नाहीत. टाळेबंदीत हे प्रमाण वाढल्याने चिमुकल्यांमध्ये ऍलर्जी, डोळे दुखणे, लाल होणे, डोळे खाजवणे, डोके दुखणे आदी समस्या उद्‌भवत आहेत. विशेषत: 5 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
 

डोळ्यावर येतो ताण


सातत्याने कॉम्प्युटर आणि मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे ऍलर्जी, डोळे दुखणे, लाल होणे, डोळे खाजविणे, डोके दुखणे, दृष्टिदोष आदी समस्या उद्‌भवतात. विशेष म्हणजे सर्वाधिक समस्या मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेत असताना, अधिक प्रमाणात डोळ्यांवर ताण आल्याने दृष्टिदोष अधिक प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे.
 

अभ्यास करताना ब्रेक घ्या
मोबाईल आणि कॉम्प्युटरवर सातत्याने काम करीत असताना, किमान अर्धा आणि एका तासाने ब्रेक घेण्याची गरज आहे. पाच ते दहा वर्षांच्या लहान मुलांना याचा त्रास अधिक होत असून त्यांना डोळ्यात जळजळणे, डोळे कोरडे पडणे आणि अनेक समस्या उद्‌भवत असल्याने त्यांना मोबाईल आणि कॉम्प्युटरपासून दूर ठेवा.
डॉ. अशोक मदान,
विभागप्रमुख, नेत्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com