मंत्री महोदय जरा नागपूरकडेही लक्ष द्या...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

नागपुरातील क्वारंटाइन केंद्रात पुरवठा करण्यात येत असलेले जेवण निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखलच घेतली नाही.

नागपूर : नाशिकमध्ये निकृष्ट तांदळाचा पुरवठा झाल्याच्या कारणावरून अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. नागपुरातील क्वारंटाइन केंद्रात निकृष्ट भोजनाचा पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मंत्रिमहोदयांनी याकडे लक्ष देत निकृष्ट भोजनास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे गरीब, कामगारांची चांगलीच अडचण झाली. हाताला काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला. सरकारने अंत्योदय, प्राधान्य गटासोबत एपीएल कार्डधारकांनाही रेशन दुकानातून स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. हे धान्य चांगल्या दर्जाचे देण्याचे सूचना केल्या.

त्याच प्रमाणे क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांनाही भोजन देण्याची व्यवस्था केली. रेशनदुकानातून देण्यात येणार धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनात आले.

Video :खासदार पत्नी आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...

याप्रकरणी त्यांनी दोन नागपूर आणि गडचिरोलीतील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उभारला. नागपुरातील क्वारंटाइन केंद्रात पुरवठा करण्यात येत असलेले जेवण निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखलच घेतली नाही. निकृष्ट भोजनप्रकरणी फक्त कंत्राटदार बदलण्याची थातूरमातून कारवाई झाली.

वास्तविक पाहता भोजन तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. त्यामुळे यात अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. रेशनदुकानातूनही योग्यरीत्या धान्य मिळत नसल्याची ओरड आहे. एप्रिल, मे महिन्यात डाळीच मिळाल्या नसून धान्याचा दर्जाचाही चांगला नसल्याची तक्रारी होत्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता मंत्रिमहोदयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 
"त्या' दोन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करा

निकृष्ट तांदूळ पुरवठा केल्याप्रकरणी नागपूर आणि गडचिरोली येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. लॉकडाउन काळात अधिकारी व रेशन दुकानदारांनी चांगले काम केले. असे असतानाही कारवाई केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अधिकारी, कर्मचारी संघटनेने केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inferior meals at the quarantine center in nagpur