काँग्रेसमधील गटबाजी संपता संपेना; पराभव निश्चित तरी महापौरपदासाठी दोघांनी भरले अर्ज

Internal matters in Nagpur Congress two candidates fill form for mayor seat
Internal matters in Nagpur Congress two candidates fill form for mayor seat

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं संपूर्ण जोर लावत भापच्या गडाला खिंडार पाडलं. तेव्हा शहरातील कॉंग्रेस एकवटली असल्याचा साक्षात्कार झाला होता. पण आता ५ जानेवारीला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या दोघांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे गटबाजी कायम असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कॉंग्रेसच्या दोघांपैकी एक जण माघार घेण्याची शक्यता आहे. पण माघार घेणार कोण, हे गूढअद्यापही कायम आहे.  

महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे दोन तर राष्ट्रवादीकडे एकच सदस्य आहे. महाविकास आघाडीकडून नगरसेवक मनोजकुमार गावंडे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदाकरिता मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. विकास ठाकरे समर्थक रमेश पुणेकर, नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून नरेंद्र वालदे व उपमहापौर पदाकरिता वैशाली नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले.

भाजपतर्फे दयाशंकर तिवारी तर उपमहापौरपदासाठी मनीष धावडे यांनी दावेदारी दाखल केली. काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याचे दाखवीत महापौरपदासाठी रमेश पुणेकर, मनोज गावंडे तर रश्मी धुर्वे आणि मंगला गवरे यांनी उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसचा पराभव निश्चित असला तरी वर्चस्वासाठी शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि तानाजी वनवे यांनी आपल्या समर्थकांना उभे राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे भाजपकडे १०८ तर काँग्रेसकडे फक्त २८ नगरसेवक आहेत.

प्रदेशाध्यक्षांच्या पत्राकडे दुर्लक्ष

महाविकास आघाडीतर्फे एकत्रित निवडणूक लढविल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ठाकरे आणि पालकमंत्री नितीन राऊत समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केल्याने महाविकास आघाडीत महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे स्पष्ट होते. सुमारे चार वर्षांपासून काँग्रेसमधील गटबाजी सुरू आहे. दोन्ही गट माघार घ्यायला तयार नाहीत. 

परस्पर उमेदवार केले निश्चित 

प्रदेशाध्यक्षाच बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे महापौरपदाचा उमेदवार निवडण्यासाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घ्यावी, अशी सूचना केली होती. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना २९ डिसेंबरला पत्रही पाठवले होते. मात्र पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. परस्पर उमेदवार निश्चित करण्यात आले आणि उमेदवारी अर्जसुद्धा दाखल करण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com