esakal | जरा जपून रे राजा, राजमार्ग झालाय खाचखड्डयांचा ! अनेक ठिकाणी हे मार्ग आहेत धोकादायक...
sakal

बोलून बातमी शोधा

कळमेश्‍वरः  कळमेश्वर-काटोल-नागपूर महामार्गाची झालेली दुरवस्था.

‘महाजनो येन गतः स पन्थाः’,महर्षी व्यासांनी पुराणात हे वचन लिहून ठेवलं. याचा अर्थ असा की, धर्माचे स्वरूप इतके गहन आणि रहस्‍यमय आहे की जसे की हे ज्ञान गुफेत लपलेले आहे की काय! शेवटी त्याचा सखोल अभ्यास कोणीच करू शकत नाही. त्या मार्गाची ज्यांनी घोर तपस्या केली असेल त्यांच्या मार्गाचेच सर्वसामान्यांनी अनुकरण करावे. हे झाले पुराणातले प्रत्यक्ष सर्वसाधारणपणे हाच अनुभव आपल्याला येतो. परंतू कळमेश्‍वर-काटोल महामार्ग हा मार्ग तसा राजपथच. या मार्गाने अनेकदा केंद्रीय मंत्री, राज्य शासनाचे मंत्री ये-जा करतात. मात्र सर्वसामान्यांच्या अडचणींकडे लक्ष न देण्याचा त्यांचा शिरस्ता आवागमण करणाऱ्यांच्याही लक्षात येत नाही.

जरा जपून रे राजा, राजमार्ग झालाय खाचखड्डयांचा ! अनेक ठिकाणी हे मार्ग आहेत धोकादायक...

sakal_logo
By
चंद्रकांत श्रीखंडे


कळमेश्वर (जि.नागपूर) : ‘महाजनो येन गतः स पन्थाः’,महर्षी व्यासांनी पुराणात हे वचन लिहून ठेवलं. याचा अर्थ असा की, धर्माचे स्वरूप इतके गहन आणि रहस्‍यमय आहे की जसे की हे ज्ञान गुफेत लपलेले आहे की काय! शेवटी त्याचा सखोल अभ्यास कोणीच करू शकत नाही. त्या मार्गाची ज्यांनी घोर तपस्या केली असेल त्यांच्या मार्गाचेच सर्वसामान्यांनी अनुकरण करावे. हे झाले पुराणातले प्रत्यक्ष सर्वसाधारणपणे हाच अनुभव आपल्याला येतो. परंतू कळमेश्‍वर-काटोल महामार्ग हा मार्ग तसा राजपथच. या मार्गाने अनेकदा केंद्रीय मंत्री, राज्य शासनाचे मंत्री ये-जा करतात. मात्र सर्वसामान्यांच्या अडचणींकडे लक्ष न देण्याचा त्यांचा शिरस्ता आवागमण करणाऱ्यांच्याही लक्षात येत नाही.

नाहक जाताहेत निष्पापांचे बळी
कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्गाच्या दुरावस्थेकडे तसे कुणाचे लक्ष गेले असावे, असे अजिबात वाटत नाही. हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे अलिकडच्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. गेल्या आठ वर्षांत अनेक जणांना या मार्गावर जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हेकेखोरीमुळे शेकडोंचे मात्र नाहक बळी जात आहेत. जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग असून कळमेश्वर, काटोल, नरखेड ते वरुड तालुक्यांपर्यंतच्या वाहतुकीचा दुवा म्हणून हा महामार्ग ओळखला जातो. या महामार्गावरील वाढती वाहतूक व औद्योगिकीकरण, शिक्षण झोन लक्षात घेता राज्य सरकारने या मार्गाचे काम करणे अपेक्षीत होते. १५ किलोमीटरपर्यंतचा हा रस्ता निव्वळ खड्ड्यांनी व्याप्त आहे. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने झाली आणि प्रशासनाचे लक्षही वेधण्यात आले. मात्र काहीही फरक पडला नाही.
 
अधिक वाचाः सावधान! नागपूर जिल्ह्यतील गावे पार हादरली, कारण आहे हे...
 

बरेचदा खड्डयांचा अंदाजच येत नाही
सद्यस्थितीत कळमेश्वरवरून नागपूरला निघाल्यानंतर दहेगाव ते येरला या गावापर्यंत या मार्गावर अनेक ठिकाणी एक ते तीन फुटांपर्यंत खोल खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. पावसाचे पाणी साठून राहते. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ वर्षांत अनेक जणांना या मार्गावर जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी होऊन अपंग झाले आहेत. सद्यस्थितीत या मार्गावर अनेक ठिकाणी एक ते पाच फुटांचे मोठे खड्डे पडलेले आहेत.रस्त्यावरून वाहन चालवताना जीवघेण्या खड्ड्यांमुळे कसरत करून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सार्वजाणिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा लहान मोठ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. पडलेले मोठमोठे खड्डे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकींचे वारंवार अपघात होत असून, यात महिलांसह दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो आहे. नागरिकांचे जीव जात असताना बांधकाम विभागाच्या कारभाऱ्यांची मात्र रस्ते दुरुस्तीबाबत उदासिनता दिसून येत आहे. प्रशासनाचे या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

पायाभूत सुविधांनाही ‘खो’
रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा देण्यातही शासन अपयशी ठरत आहे. वैद्यकीय आणि व्यापारिदृष्ट्या व शैक्षणीकद्रुष्ट्या महत्वाच्या असलेल्या  कळमेश्वर, काटोल शहरातील वाहनांची मोठी वर्दळ असते. लांब पल्ल्याची अवजड वाहनेही मोठ्या संख्येने ये-जा करतात. वाहनांची वर्दळ वाढत असताना येथील हा महामार्ग मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाचे रुंदीकरण गेल्या ५  वर्षांपासून रखडले आहे.  

हेही वाचाः शेतकरी म्हणतात काळाबाजार, कृषी विभाग सांगतो एवढया युरीयाची गरजच नाही...

टेकाडी ते बोरडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
कन्हान : टेकाडी ते बोरडा रस्त्यानी शिवारातील शेतकऱ्यांचा मुख्य रस्ता अतून या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नसल्याने शेकडो शेतकऱ्यांचा वर्दळ असल्याने दैनंदिनी मनस्ताप सहन करावा लागतो. परिसरातील शेतकरी दैनंदिनी शेतात ये-जा करतात. हा रस्ता नागपूर ते रामटेक रेल्वे लाईन पुलाखालून असून ठिकठिकाणी सिमेंटचे पोल उभे व पडलेले असल्याने शेतात बीयाणे, सल्फेट, पिक व ईतर साहित्य बैलबंडी, चारचाकी गाड्या ने-आण करण्यास भयंकर त्रास होतो. या विषयी भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विनोद यादव यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, तरी दुर्लक्ष होत असल्याने शासनाने शेतकऱ्यांना शेती करण्यास सोयीस्कर व्हावे यास्तव पुलाखालील रस्त्याचे डांबरीकरण किंवा उडाण पुल बनविण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक भगवानदास यादव, भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विनोद यादव, विशाधर कांबळे, अविनाश कांबळे, किशोर वासाडे, गिरीश शुक्ला आदीसह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

go to top