esakal | ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiraditya Sindhiya  vistited RSS smruti mandir at nagpur

काही महिन्यांपूर्वी  सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. काँग्रेसमधील वातावरण आता अनुकूल नाही त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला होता.

ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर: एकेकाळी काँग्रेसचे युवा नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील परिसराला भेट दिली. सिंधिया हे पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी  सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. काँग्रेसमधील वातावरण आता अनुकूल नाही त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला होता. मात्र आता त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच नागपुरातील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली आहे. तसेच संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. 

स्मृती मंदिर परिसरात दाखल 

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी या दोघांच्याही समाधी स्थळाचे दर्शन घेतले. 

संध्याकाळी जाणार संघ मुख्यालयात?

ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या पहिल्याच नागपूर दौऱ्यावर असताना आज संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

प्रेरणादायी स्थळ 

"डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान म्हणजे एक प्रेरणादायी स्थळ आहे. त्यामुळेच मी इथे भेट द्यायला आलो आहे" अशी भावना यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली आहे.