esakal | टापटीपमध्ये पतीने घराबाहेर पाऊल ठेवले, तोच पत्नी म्हणाली मला सारे माहिती आहे आणि... 
sakal

बोलून बातमी शोधा

knife stabbed in wife's head; Suspicion of immoral relationship

विक्की दामोदर रोकडे (वय 35) असे अटकेतील पतीचे तर नयना विक्की रोकडे (वय 28) असे जखमी पत्नीचे नाव आहे. विक्की कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

टापटीपमध्ये पतीने घराबाहेर पाऊल ठेवले, तोच पत्नी म्हणाली मला सारे माहिती आहे आणि... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पती नेहमीच टॉपटीपमध्ये बाहेर जातो आणि तिकडून आला की न बोलता झोपतो. तसेच रात्रीच्या सुमारास चोरून लपून फोनवरही बोलतो तसेच मध्यरात्रीपर्यंत वॉट्‌स ऍपवर ऑनलाईन राहतो, हा सर्व प्रकार बघून पतीचे कुठेतरी बाहेरवालीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नीला आला. याच कारणावरून दोघांचा सतत वाद व्हायचा. पतीच्या वागण्यावरून पत्नी नेहमी त्याला टोकायची आणि वादाला सुरुवता व्हायची. एक दिवस असेच काहीतरी कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि वाद विकोपाला गेला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडायचे. सततचा वाद विकोपाला गेला आणि अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या वादातून पतीने चाकूने वार करून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना अजनी रेल्वे क्वॉर्टर येथे रविवारी घडली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर पतीला अटक केली आहे. 

क्लिक करा - तेरी बहन बहोत माल दिखती हैं', हे ऐकताच तो संतापला आणि... 
 

विक्की दामोदर रोकडे (वय 35) असे अटकेतील पतीचे तर नयना विक्की रोकडे (वय 28) असे जखमी पत्नीचे नाव आहे. विक्की कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्ये त्याच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई झाली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही तो रेल्वेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

विक्की याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय नयना यांना आहे. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. रविवारी विक्की बाहेर जात होता. नयन यांनी त्याला हटकले. बाहेर कशाला जात आहात, याबाबत मला माहिती आहे, असे नयना विक्कीला म्हणाल्या. त्यामुळे विक्की संतापला. त्याने चाकूने नयना यांच्या डोक्‍यावर वार केले आणि पसार झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस रेल्वे क्वॉर्टरमध्ये पोहोचले. नयना यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी शोध घेऊन विक्की याला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. 


अडीच लाखांचे दागिने लंपास 

अज्ञात चोराने बंद घरातील कपाटातून 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी बृहम नागपूर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी निवासी ज्योत्सना श्रीकांत सतदेवे (47) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 14 एप्रिलला ज्योत्सना यांनी आपल्या गेस्ट हाऊसमध्ये लाकडी कपाटाच्या खालच्या ड्राव्हरमध्ये एका प्लॅस्टिकच्या डब्यात 2,38,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. यानंतर त्यांनी थेट 21 जूनला कपाटात दागिने पाहिले असता ते तेथे नव्हते. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी संपूर्ण कपाट आणि गेस्ट हाऊसमध्ये दागिन्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही. दरम्यानच्या काळात कोणीतरी त्यांच्या कपाटातील दागिने चोरून नेले. त्यांनी घटनेची तक्रार सोनेगाव ठाण्यात केली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला.