हॉटेल घेता का हॉटेल! झळकू लागले फलक

To Let a Hotel ! The Boards Began to Flash
To Let a Hotel ! The Boards Began to Flash

नागपूर :  टाळेबंदीत हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक फटका बसल्याने संचालकांचा रोजगार गेला तसाच कामगारही बेरोजगार झाले आहेत. अनेकांनी भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल चालविणे परवडत नसल्याने ते कायमचे बंद केले आहे. त्यामुळे पूर्वी हॉटेल असलेल्या ठिकाणांवर जागा ‘भाड्याने देणे आहे‘ अशा पाट्या झळकू लागल्या आहेत. 

राज्य शासनाने हॉटेल व उपहार गृह उघडण्याची परवानगी दिली आहे. तरी अद्यापही ग्राहक सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीपोटी घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. बाहेर जेवायला जाणेही अनेकजण टाळत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या अतिशय कमी आहे.

सलग सहा महिन्यापासून हॉटेल बंद असल्याने संचालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेलचे भाडेही देणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व उपहार गृह संचालकांनी जागेच्या मालकांसोबत संपर्क करून हॉटेल बंद करणार असल्याचे सांगितले आहेत. पुढील काही महिने हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस नाहीत. त्यामुळे घाट्याचा सौदा नको म्हणून अनेकांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक हॉटेलच्या दर्शनी भागात ‘टू लेट' अशा पाट्या झळकू लागल्या आहेत.

शहरातील सक्करदरा, त्रिमूर्ती नगर, बजाज नगर, लक्ष्मी नगर, माटे चौक, प्रताप नगर, सदर, इतवारी, धरमपेठ, वर्धमान नगर, मानेवाडा रोड, मनीष नगर, वर्धा रोड, सीताबर्डी, लष्करी बाग, इंदोरा, जरीपटका, मानकापूर, कोराडी रोड, गोळीबार चौक, मोमिनपूरा, सेन्ट्रल एव्हेन्यू, आझमशहा चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, नंदनवन, दिघोरी नाका, भंडारा रोड, अमरावती रोड या महत्त्वाच्या परिसरातील अनेक हॉटेल बंद झालेले आहेत. 

हॉटेल व्यावसायिकांना सूट द्यावी 

सध्याच्या परिस्थितीत जागेचे भाडे देणेही अशक्य झालेले आहे. भाडेतत्तावर असलेली २० ते २५ टक्के हॉटेल्स बंद झालेली आहेत. हॉटेल व्यवसायाला बुस्ट मिळावा अशी कोणतीही योजना सरकारने आणली नाही. मुंबई मनपाने काही महिन्याच्या स्थानिक करातून सूट दिलेली आहे. तशीच सूट मनपाने शहरातील हॉटेल व्यावसायिकांना द्यावी. 
प्रकाश त्रिवेदी, माजी अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्ट हॉटेल्स असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com