अबब पावणेदोन कोटींचा दारूसाठा जप्त, राज्यातील हे शहर आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

राज्यभरात 3 हजार 652 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2 हजार 316 आरोपींना अटक केली. 1 कोटी 75 लाख 54 हजारांचा माल जप्त करण्यात आला. यात 17 हजार 365 लिटर देशी तर 1228 लिटर विदेशी दारूचा समावेश आहे. सर्वाधिक गावठी दारू आहे. या कारवाई राज्यात नागपूर आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 250 गुन्हे दाखल करण्यात आलेत.

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. दारूची दुकाने बंद करण्यात आली. यानंतरही मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत आहे. उत्पादन शुल्क विभागाने या काळात पावणेदोन कोटींचा दारूसाठा जप्त केला. 2 हजार 316 आरोपींना अटक केली. या कारवाईत नागपूर आघाडीवर आहे.
कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोकांना याची लागण झाली आहे. हजारोंचा मृत्यू झाला. या आजारावर नियंत्रणासाठी 18 मार्चपासून राज्यात लॉकडाउन करण्यात आले. दारू दुकाने बंद करून विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला. मात्र, यानंतरही चोरट्या मार्गाने याची विक्री सुरू आहे. उत्पादन शुल्क व पोलिस विभागाकडून या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अवैध विक्रीप्रकरणी राज्यभरात 3 हजार 652 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2 हजार 316 आरोपींना अटक केली. 1 कोटी 75 लाख 54 हजारांचा माल जप्त करण्यात आला. यात 17 हजार 365 लिटर देशी तर 1228 लिटर विदेशी दारूचा समावेश आहे. सर्वाधिक गावठी दारू आहे. या कारवाई राज्यात नागपूर आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 250 गुन्हे दाखल करण्यात आलेत. 191 आरोपींना अटक करण्यात आली. तर, 35 लाख 26 हजारांचा माल जप्त करण्यात आला. 16 वाहनेही जप्त केली. त्यापाठोपाठ पुणे असून, 230 गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक कमी म्हणजे 13 गुन्हे गडचिरोली जिल्ह्यात दाखल आहेत. मुंबईत 26 गुन्हे दाखल असून, 13 लाख 9 हजारांचा माल जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

मास्क, सॅनिटायझरचा उपयोग
अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष योजना तयार केली होती. कारवाईतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कसोबत सॅनिटायझरचा उपयोग करण्यात आला.
-रावसाहेब कोरे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liquor of caror seized