esakal | प्रशासनाला दारुड्यांची किती चिंता! मद्य विक्रीचे दुकान बंद; मात्र, घरपोच सेवा सुरू

बोलून बातमी शोधा

Liquor stores closed but home delivery service resumed Nagpur news}

नागपूर : गांधीबाग झोनमध्ये इतवारी भागात बंददरम्यान फिरताना दारूचे दुकाने सुरू असल्याचे मोबाईलवरून माहित होताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी आश्चर्यासोबतच संताप व्यक्त केला. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना फोन करून विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकान सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी दारू दुकानातून नव्हे तर घरपोच मिळेल, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शनिवारी दिवसभर दारूची दुकाने सुरू असल्याने सोशल मीडियावरही प्रशासनाचा निर्णय थट्टेचा विषय ठरला होता.

nagpur
प्रशासनाला दारुड्यांची किती चिंता! मद्य विक्रीचे दुकान बंद; मात्र, घरपोच सेवा सुरू
sakal_logo
By
राजेश प्रायकर-नीलेश डोये

नागपूर : गांधीबाग झोनमध्ये इतवारी भागात बंददरम्यान फिरताना दारूचे दुकाने सुरू असल्याचे मोबाईलवरून माहित होताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी आश्चर्यासोबतच संताप व्यक्त केला. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना फोन करून विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकान सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी दारू दुकानातून नव्हे तर घरपोच मिळेल, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शनिवारी दिवसभर दारूची दुकाने सुरू असल्याने सोशल मीडियावरही प्रशासनाचा निर्णय थट्टेचा विषय ठरला होता.

महापौर तिवारी यांनी सकाळी इतवारी, गोकुळपेठ मार्केटमध्ये फिरून दुकाने बंद करण्याचे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. इतवारी भागात फिरताना त्यांच्याच प्रभागातील गांजाखेत भागात दारूचे दुकान सुरू असल्याची माहिती त्यांना दिली.

अधिक माहितीसाठी - काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी

जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकाने बंदचे आदेश असताना दारूचे दुकान कसे सुरू? दारू जीवनावश्यक वस्तूंमध्ये नसतानाही दुकान का सुरू केले? याबाबतची त्यांनी माहिती घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकान बंद न करण्याचे आदेश असल्याचे समजले.

त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी ठाकरे यांना फोनवर विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही दारूचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून केवळ पार्सल देण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. महापौरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे.

त्यामध्ये दारू दुकानांचाही समावेश आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे महापौर म्हणाले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूची दुकाने बंद ठेवून लॉकडाऊनच्या काळाप्रमाणे घरपोच मिळेल, असे सांगितले.

जाणून घ्या - पोलिसांनी घेतला लॉकडाऊनचा गैरफायदा; शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावीत
जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री रविवारी बंद राहील. परंतु, घरपोच सुविधा सुरू राहील. दर शनिवार, रविवार दारू विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवावीत. मद्य विक्री दुकानातून विक्री होणार नाही. लॉकडाऊनच्या काळाप्रमाणे घरपोच सुविधा सुरू राहील.
- रवींद्र ठाकरे,
जिल्हाधिकारी