हॉटेल्स, बार बंद असल्याने तिकडची वर्दळ वाढली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

या भागात "गल्लोगल्ली' बड्या व्यावसायिकांच्या व गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. प्रत्येक गावात किमान दोन चार तरी फार्महाउस असून, गेत्या काही दिवसांपासून या फार्महाउसच्या दिशेने येणारी वर्दळ वाढलेली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे अनेकजण शहराच्या बाहेरील फार्महाउसवर पार्ट्या करण्याचे नियोजन आखत आहेत. मात्र, याच तालुक्‍यातून आत्तापर्यंत वीसहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे हे सर्वच विसरलेले आहेत.

नागपूर : शहरापासून अवघ्या वीस ते पंचवीस किमी अंतरावर असलेल्या हिंगण्यातील मोहगाव झिलपीत सध्या ओल्या पार्ट्यांना ऊत आलेला आहे. विशेष म्हणजे या तालुक्‍यातील वीसहून अधिक लोकांना कोरोना झालेला असून, हिंगणा कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये यासाठी शासन सर्वस्तरावरून प्रयत्न करीत आहे. 

कधीकाळी औद्योगिक विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगण्यात एक दोन नव्हे तर बाराहून अधिक छोट्या मोठ्या जलाशयांची शृंखला आहे. सालईमेंढा, झिल्पी, भिवकुंड, कोन्होलीबारा, बिड बोरगाव, पिटसून हे जलाशय तर हिंगण्यापासून अगदी आठ किमींच्या अंतरावर असून, जलपातळीमुळे हा परिसर खऱ्या अर्थाने निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. या भागात "गल्लोगल्ली' बड्या व्यावसायिकांच्या व गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. प्रत्येक गावात किमान दोन चार तरी फार्महाउस असून, गेत्या काही दिवसांपासून या फार्महाउसच्या दिशेने येणारी वर्दळ वाढलेली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे अनेकजण शहराच्या बाहेरील फार्महाउसवर पार्ट्या करण्याचे नियोजन आखत आहेत. मात्र, याच तालुक्‍यातून आत्तापर्यंत वीसहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे हे सर्वच विसरलेले आहेत. 

वाचा : भारतात कुठे दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण, घ्या जाणून 

मोहगाव येथील एका फार्महाउसवर रविवारी जंगी पार्टी झाली. तब्बल साठ ते सत्तर जणांनी या पार्टीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे ज्यावेळी ही पार्टी सुरू होती त्याचवेळी शेजारी असलेल्या एरणगावात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची चर्चा होती. गावातील मंडळींना विचारले असता अशा पार्ट्या रोजच्याच असल्याची त्यांनी माहिती दिली. शुक्रवारी, 12 तारखेला या भागाची जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पाहणी केली आहे. हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होणार नाही याची शासन दक्षता घेत आहे. मात्र, संकटकाळात जेथे कोरोनाचे रुग्ण सापडतात तेथेच पार्ट्या रंगत असल्यामुळे आरोग्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lock down period party at hingana farmhouse