धक्कादायक, गृहमंत्र्याच्या जिल्ह्यातील ऑईल डेपोंवर माफिया राज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

बोरखेडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर माफियांनी हल्ला केला होता. त्यामुळे त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे. पूर्वी टॅंकरद्वारे चोरी केलेला माल विकण्यासाठी माफियांना अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु, आता केंद्र शासनाच्या धोरणाचा दुरुपयोग करून या माफियांनी छोटे मोबाईल पेट्रोल पंप बनवून घेतले आहे. कोणतीही परवानगी नसताना हे मोबाईल पंप रस्त्यावर ट्रक चालकांना डिझेलची विक्री करीत आहे. काही टॅंकरवर बायो डिझेल लिहून या अवैध डिझेलची विक्री केली जात आहे. या मोबाईल पंपावर निर्बंध लावणे आवश्‍यक अशी मागणी असोसिएशनने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली आहे

नागपूर : विदर्भातील ऑइल कंपनीचे डेपो व इंधन वितरण व्यवस्था माफियांच्या विळख्यात सापडल्याचा आरोप विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने केला आहे. वाळूमाफियांवरील हल्ले थांबविण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले असताना इंधन वितरणही माफियांच्या विळख्यातून मुक्त करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

विदर्भात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही ऑइल कंपन्याचे डेपो आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील खापरी, बोरखेडी, चंद्रपूर जिल्ह्यातील तडाली येथे इंडियन ऑइल तर अकोला जिल्ह्यातील नायगाव येथे तिन्ही कंपन्यांचे डेपो आहेत. वर्धा जिल्ह्यात तुकताजा नायरा एनर्जी लिमिटेडचा डेपो सुरू झालेला आहे. या डेपोतून विदर्भातील सर्व पंप चालक व सरकारी विभागांना टॅंकरद्वारे इंधनाचा पुरवठा होतो. या ठिकाणातून इंधन वाहतूक करण्याकरिता निविदा काढण्यात येते. यात पंप मालकाव्यतिरिक्त सर्वसामान्य व्यक्ती कंपनीच्या अटीनुसार भाग घेऊ शकतात. श्रीमंत किंवा ज्यांच्या इंधनाची विक्री अधिक आहे असे पंप मालक स्वतःचा टॅंकर व्यवसायाकरिता लावतात. सर्वसामान्य किंवा ज्या पंप मालकांची विक्री सामान्य आहे त्यांना कायद्यानुसार योग्य व सुस्थितीतपणे इंधनाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ऑइल कंपन्यांची असते. कंपनीच्या या धोरणाचा फायदा घेऊन अनेक माफिया वाहतूकदार झालेले आहेत. त्याबाबत पोलिस आणि माफिया यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशयही व्यक्त केल्या जात आहे. 

...अन्‌ तुकाराम मुंढे तावातावात सभागृहातून निघून गेले; इतिहासातील पहिलीच घटना

बोरखेडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर माफियांनी हल्ला केला होता. त्यामुळे त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे. पूर्वी टॅंकरद्वारे चोरी केलेला माल विकण्यासाठी माफियांना अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु, आता केंद्र शासनाच्या धोरणाचा दुरुपयोग करून या माफियांनी छोटे मोबाईल पेट्रोल पंप बनवून घेतले आहे. कोणतीही परवानगी नसताना हे मोबाईल पंप रस्त्यावर ट्रक चालकांना डिझेलची विक्री करीत आहे. काही टॅंकरवर बायो डिझेल लिहून या अवैध डिझेलची विक्री केली जात आहे. या मोबाईल पंपावर निर्बंध लावणे आवश्‍यक अशी मागणी असोसिएशनने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढावा असे असोसिएशनचे सचिव प्रणय पराते यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mafia Dominates Oil Depots