पोलिस दलात लवकरच मोठे फेरबदल, कुणाची लागणार लॉटरी...

Major changes in the Nagpur police force soon
Major changes in the Nagpur police force soon

नागपूर :  शहर पोलिस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. काही पोलिस निरीक्षकांना ठाणेदारी तर काहींना थेट साईड ब्रॅंच अटॅच करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. काही अधिकाऱ्यांनी ठाणेदारी मिळविण्यासाठी थेट फिल्डिंगसुद्धा लावली आहे. राज्यातील काही आयपीएसच्या बदल्यावरून दोन पक्षात वाद झाले. मात्र, शहरात आवश्‍यक ते फेरबदल होण्याची शक्‍यता आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलातील अनेक पोलिस निरीक्षक सध्या "डम्पिंग यार्ड' म्हणजे साईड पोस्टिंगमध्ये काम करीत आहेत. तर काही ज्युनियर अधिकारी हे ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. शहरातील काही पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांचा कार्यकाळ संपत आला असूनही ते अजूनही ठाण्यांमध्ये "फेव्हिकॉल'प्रमाणे चिकटूनच आहेत. तर काहींना साईड ब्रॅंचमध्ये वर्षानुवर्षे ठेवले जात आहे.

नुकतेच प्रमोशन मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा ठाणेदारी मिळविण्याच्या शर्यतीत भाग घेतला आहे. काही ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठ नाराज असल्यामुळे बदल्या करून त्या ठाण्यांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होऊ शकते. तसेच काही वादग्रस्त पोलिस ठाणेदारांमुळे पोलिस खात्याची बदनामी झालेली आहे.

त्यामुळे त्या ठाणेदारांनाही बदलण्यात येण्याची शक्‍यता आहे. काही ठाणेदारांच्या अनेक तक्रारी पोलिस आयुक्‍त तसेच पोलिस उपायुक्‍तांकडे आल्या आहेत. सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींची आयुक्‍तांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे काही ठाणेदार डम्पिंग यार्डमध्ये जाण्याची शक्‍यता आहे तर काही नवीन पोलिस निरीक्षकांना नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची संकेत वरिष्ठांच्या कार्यालयातून मिळाले आहेत.


वाहतूक शाखेतही होणार बदल

पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासह वाहतूक शाखेतही मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांची बदली वाहतूक शाखेत होण्याचे संकेत आहेत. तर वाहतूक शाखेतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना कात्री लागू शकते. वाहतूक शाखेत वादग्रस्त असलेल्या अधिकाऱ्यांना कंट्रोल अटॅच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com