मनेका गांधींच्या फोनवरून टळला दोन बोकडांचा बळी

सतिश डहाट
Thursday, 29 October 2020

देवदेवतांना खूश करण्यासाठी मुक्या जनावरांचा बळी  देणे हे काही सुजाण नागरिकांना खटकते. म्हणूनच जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग पार्क परिसरातील मॉं दुर्गा सप्तशती मंदिरात जागृत तरुणीच्या तप्तरतेने  माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांना मोबाईलद्वारे कळवून टळला.

कामठी (जि.नागपूर):अनादी काळापासून देवीला प्रसन्न करण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची अंधश्रद्धा समाजात रुढ आहे. कुणी नवस पूर्ण झाला की देवदेवतांना मुक्या जनावरांचा बळी देऊन उत्सव करण्याची हौस पूर्ण  केली जाते. परंतू  देवदेवतांना खूश करण्यासाठी मुक्या जनावरांचा बळी  देणे हे काही सुजाण नागरिकांना खटकते. म्हणूनच जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग पार्क परिसरातील मॉं दुर्गा सप्तशती मंदिरात जागृत तरुणीच्या तप्तरतेने  माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांना मोबाईलद्वारे कळवून टळला. ही घटना २७ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी विरोधात जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचाः अचानक का गुदमरतोय श्‍वास? उमरेडकरांना आता नकोसे झाले वायुप्रदूषण !
 

बोकड केले जप्त
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग पार्क परिसरातील मॉ दुर्गा सप्तशती मंदिरात दसऱ्याच्या पाडव्याच्या पर्वावर काही नागरिक दोन बोकडाचा बळी देत असल्याची माहिती कामठी येथील एका २५ वर्षीय तरुणीला मिळाली. या तरुणीने त्याचा व्हिडिओ तयार करून घटनेची माहिती चक्क माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांना मोबाईलद्वारे दिली. मेनका गांधी यांनी त्वरित दखल घेत नागपूर जिल्हा प्राणी संरक्षण समितीच्या पदाधिकारी करिष्मा गोविंद गिलानी ( वय४४, नागपूर) यांना माहिती दिली. त्यांनी लगेच जुनी कामठी पोलिस ठाणे गाठून दोन  बोकडांच्या बळीविषयी तक्रार केली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून दोन काळ्या रंगाचे बोकड जप्त केले. दोन्हीही  बोकड बकऱ्यांना नवीन कामठी परिसरातील  गोरक्षणात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दोन्ही बकऱ्यांची बोकडाची किंमत सहा हजार रुपये असून करिष्मा गोविंद गिलानी  (वय४४, नागपूर) यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात प्राण्यांना छळ  प्रतिबंधक कायदा १९६० सहकलम ५ (क )९( अ ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार देवदास कठाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maneka escaped from Gandhi's phone and killed two goats