26 हजार 999 रुपयात संपूर्ण लग्न

मनीषा मोहोड-येरखेडे
गुरुवार, 4 जून 2020

मंगलकार्यालय व लॉन वाल्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. आधी बुकींग करून ठेवलेल्या वधूपक्षाला ऍडवॉन्स परत करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनपूर्वीच बहुतेक मंगलकार्यालयांचे बुकींग बऱ्याच प्रमाणात झाले होते.

 

नागपूर : वधु वरांची स्वतंत्र व्यवस्था, मोजके पाहुणे, रुचकर जेवन आणि कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षेचे उपाय या चतुः सुत्राचा वापर करून, आखीव रेखीव सुंदर विवाहसोहळा कमी खर्चात आयोजित करण्याचा नवीन व्यावासायिक दृष्टिकोन सभागृह, लॉन मालकांनी स्विकारीत कोरोना विषाणूमुळे रोखलेले विवाहसोहळे पार पाडण्यावर भर दिला आहे. 
विवाह सोहळा कुटुंब संस्थेचा मुख्य आधार आहे. समाजात विवाह धडाक्‍यात करण्याची परंपरा आहे. अलिकडच्या काळात हा सोहळा मंगलकार्यालय, सभागृह आणि लॉन तसेच हॉटेलमध्ये साजरा करण्याचा धडाका सुरू झालाय. लाखो रुपये खर्च करून समाजात आपली श्रीमंती दाखविण्याचा देखावा करणाऱ्या महाभागांचीही हौस यातून पूर्ण व्हायची. कोरोनाने मात्र विवाह सोहळ्यावरील खर्चाला चांगलीच कात्री लावली. 

पहा - ढगांनी दाटले नागपूरचे आकाश

मंगलकार्यालय, लॉन वाल्यांची लाखोंची कमाई बुडाली नागपूर शहरात दीड हजारावर मंगलकार्यालये आहेत. हजारावर सभागृह तर लॉनदेखील पाचशेवर आहेत. वर्षभर सर्व बूक असतात. मंगलकार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी 40 हजार रुपये असते. यापेक्षा अधिक सुविधा असणाऱ्या मंगलकार्यालयाचे भाडे लाखावर असते. लॉन आणि सभागृहाचीही स्थिती जवळपास सारखीच असते. भाड्याव्यतिरिक्त मालकांकडून विद्युत शुल्क, सफाई (स्वच्छता) शुल्क, खुर्च्यांचे भाडे, कुलर, सजावटीचे शुल्क वेगळे ऍडवांन्समध्ये घेतले जाते. कारोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू होताच. मंगलकार्यालय व लॉन वाल्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. आधी बुकींग करून ठेवलेल्या वधूपक्षाला ऍडवॉन्स परत करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनपूर्वीच बहुतेक मंगलकार्यालयांचे बुकींग बऱ्याच प्रमाणात झाले होते. मागील दोन महिन्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घरच्याघरीच विवाहसोहळा उरकला आहे. मे, जून या दोन महिन्यात आयोजित विवाह सोहळे करण्यासाठी मात्र, सभागृह, लॉन चालकांनी कोरोना विषाणूपासून बचावाच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थाही कमी खर्चात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवित आपल्या बुडणाऱ्या व्यवसायाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

मोजके पाहुणे, कमी खर्च आणि सुरक्षेची हमी 
नागपूरमधील एका लॉन, सभागृह मालकांने केवळ 26 हजार 999 रूपयांत संपूर्ण लग्न सोहळा आयोजित करून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर संदेश पसरवला असून, दिवसभरात सुमारे तीस लग्नांची बुकींग मिळाल्याचे त्यांनी सांगीतले. पारडी परीसरात असलेल्या या लॉन व सभागृहात सोशल डिस्टन्सींग सह लग्न सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

वाचा - फुटली नाही मिशी न विकतोय दारूची शिशी! या जिल्ह्यात दारूतस्करी जोमात 

कोरोना मॅरेज पॅकेज 
50 लोकांची मास्क, सॅनिटायझर ची व्यवस्था सोबत 
थर्मल स्कॅनर ने चेकींग ची सुविधा 
सोबतच डायनिंग हॉल, स्टेज वरील डेकोरेशन, रुम व्यवस्था, जेवनाची व्यवस्था 
चपाती, जीराराईस, पनीर मसाला, दालफ्राय, गुलाबजामुन, दही कडी, दही वडा, सलाद, पापड, अचार, आलु बैंगन मिक्‍स असा रूचकर जेवनाचा मेन्यू 

 

चांगला प्रतिसाद
कोरोना मुळे अनेकांची लग्न लांबणीवर पडली आहेत. लोकांना सुरक्षेची हमी वाटत नसल्याने, जीव धोक्‍यात टाकून विवाह कसा करावा या विचारात अनेक कुटुंब पडले आहेत. दरवर्षी याच सिझनमध्ये लाखोंची उलाढाल होत असल्याने, यंदा सामाजिक भान जपावे या विचारातून ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ 26 हजार 999 रूपयांत लग्न सोहळा आयोजित करून देत आहोत. आमच्या आवाहानला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसभरात 30 लग्नांचे बुकींग झाले आहे. 

गणेश हुमणे, सभागृह व लॉन मालक, नागपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage ceremony only 26 thousand 999 rupees