वर्गमित्रानेच केला विवाहित मैत्रिणीवर बलात्कार

Married girlfriend molestation by classmate
Married girlfriend molestation by classmate

नागपूर : कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली. एकाच वर्गात असल्याने मैत्री घट्ट झाली. कॉलेज संपल्यानंतर दोघेही नोकरी करायला लागले. यानंतर युवतीचे लग्न झाले. मात्र, तिचा मित्र लग्नानंतरही तिच्यावर भेटण्यासाठी दबाव टाकत होता. भीतीपोटी ती त्याला भेटायला जात होती. याचाच लाभ त्याने घेतला आणि पुढील घटनाक्रम घडला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला रिया (बदललेले नाव) ही हुडकेश्‍वरमध्ये राहते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिची वर्गात शोएब शब्बीर शेख (वय ३०, रा. रहमत मंजील, महादुला) हा युवक शिकत होता. दरम्यान, त्यांच्यात मैत्री झाली. कॉलेज संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम होती. दोघांचे बोलणे सुरू होते.

कॉलेज संपल्यानंतर शोएब ठेकेदारी करायला लागला तर रिया खासगी कंपनीत नोकरीला लागली. दोघे एकमेकांच्या संपर्कात होतेत. अशात सात वर्षांपूर्वी रियाचे लग्न झाले. तिचा पतीसुद्धा खासगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतरही शोएब रियाला भेटण्यासाठी दबाव टाकत होता. भेटायला नकार दिल्यास मैत्रीबाबत पतीला सांगण्याची धमकी देत होता. सुखी संसार तुटण्याची भीती असल्यामुळे रिया त्याला भेटायला जात होती. शोएबने तिला ब्लॅकमेल करून सीताबर्डीतील हॉटेलमध्ये नेले. तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून पाजले. बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार केला.

तुझ्याशी निवांत बोलायचे आहे

३१ जुलैला दुपारी बारा वाजता रिया सीताबर्डीत खरेदीसाठी आली होती. शोएबने तिची भेट घेतली. तिला निवांत बोलायचे असल्याचे सांगून सीताबर्डीतील हॉटेल तारा डिलक्समध्ये नेले. रियाच्या कोल्ड्रिंकमध्ये त्याने गुंगीकारक पदार्थ टाकला. बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार केला. दोन तासांनी रिया शुद्धीवर आली. बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने गयावया करून स्वतःची सुटका करून घेतली.

पतीला सांगितली हकीकत

नऊ ऑगस्टला रिया कपडे घेण्यासाठी बर्डीत आली होती. त्या दिवशीसुद्धा शोएबने तिला गाठले. पतीला सांगण्याची भीती दाखवून तिला ब्लॅकमेल करून हॉटेलमध्ये नेले व बलात्‍कार केला. शेवटी तिने पतीला सर्व हकीकत सांगितली व पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोएबला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पतीला सांगण्याची द्यायचा धमकी

शोएब हा वर्गमित्र असल्याने रिया त्याला कॉलेज संपल्यानंतरही भेटत होती. मात्र, शोएबच्या मनात दुसराच विचार सुरू होता. तो रियाला भेटण्यासाठी दबाव टाकत होता. भेटायला व आल्यात पतीला आपल्या मैत्रीबाबत सांगण्याची धमकी देत होता. सुखी संसार तुटू नये म्हणून ती शोएबला भेटायला जात होती. याचाच लाभ घेत शोएबने वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

कोल्ड्रिंकमध्ये टाकला नशायुक्त पदार्थ

रिया सीताबर्डीत खरेदीसाठी आली होती असता शोएबने तिची भेट घेतली. तिला निवांत बोलायचे असल्याचे सांगून सीताबर्डीतील हॉटेल तारा डिलक्समध्ये नेले. रियाच्या कोल्ड्रिंकमध्ये त्याने गुंगीकारक पदार्थ टाकून बलात्कार केला. नऊ ऑगस्टला रिया कपडे घेण्यासाठी बर्डीत आली होती. त्या दिवशीसुद्धा शोएबने तिच्यावर बलात्‍कार केला. वारंवार होत असलेल्या बलात्काराला ती कंटाळली होती. यामुळे तिने पतीला पूर्ण हकीकत सांगितली व गुन्हा दाखल केला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com