
गडचिरोली जिल्ह्यातील सी - ६० कमांडो आणी नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरुंगाचा स्फोट झाल्याने ते शहीद झाले.
भिवापूर (जि. नागपूर) : छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरातील जंगलामध्ये ५ मार्च रोजी नक्षली विरुद्ध कारवाईत शहीद झालेल्या भिवापूर येथील मंगेश हरिदास रामटेके या जवानावर शनिवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मंगेश रामटेके यांच्या पश्चात पत्नी राजश्री, सात वर्षीय मुलगा तज्ञ, वडील हरिदास रामटेके, आई विजयालक्ष्मी व लहान भाऊ दिनेश रामटेके असा परिवार आहे.
छत्तीसगढ येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षक जवान यांच्यामध्ये शुक्रवारी चमकम झाली होती. या चकमकीत भिवापूर येथील जवान मंगेश हरिदास रामटेके (४०) यांना विरमरण आले. मंगेश यांच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली असून, शनिवारी बंद पाळण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील सी - ६० कमांडो आणी नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरुंगाचा स्फोट झाल्याने ते शहीद झाले.
सिद्धार्थनगर परिसरात राहणारे शहीद मंगेश रामटेके हे २००७ साली आयटीबीपीमध्ये भरती झाले होते. भिवापूर येथील मरू नदीवर सायंकाळी सहा वाजता त्यांना भडाग्नी देण्यात आली. खासदार कृपाल तुमाने, आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी सावन कुमार, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोर्टेकर यांच्यासह पोलिस दल व परिसरातील नागरिक उपस्थित होते. ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.