ताटातील वाटेकरी सहन करणार नाही; ओबीसींची गडकरींच्या घरावर धडक

Mass movement across the state by OBC organizations
Mass movement across the state by OBC organizations

नागपूर : ओबीसी संघटनांतर्फे गुरुवारी राज्यभरात सामूहिक थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. उपराजधानीतही ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदारांच्या घरावर धडक दिली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण कदापि सहन करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ओबीसीच्या संघटना, ओबीसी जातींच्या संघटनांच्या प्रतिनिधींसह समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर टाळी व चमच्याचा नाद करीत आंदोलकांनी मागण्याचे निवेदन सोपविले. नितीन गडकरी यांच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात झाली. सचिवांमार्फत गडकरी यांना निवेदन देण्यात आले. 

त्यापाठोपाठ पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, आमदार समीर मेघे, आमदार परिणय फुके, आमदार टेकचंद सावरकर, आमदार विकास कुंभारे यांना निवेदन देण्यात आले. तत्पश्चात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात आले.

ओबीसी समाज जागा हो या देशाचा राजा हो, ओबीसी समाजाची जनगणना झालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात केंद्रीय सचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्ष सुषमा भड, केंद्रीय सदस्या ॲड. रेखा बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, शहराध्यक्ष संजय पन्नासे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पना मानकर, लक्ष्मी सावरकर, नंदा देशमुख, माजी नगरसेविका नयना झाडे, नाना झोडे, दिलीप गोमासे, शकील पटेल, नामदेव भुयारकर, उदय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, रमेश लेकुरवाळे, रोशन कुंभलकर, शुभम वाघमारे, विनोद हजारे, मयुर वाघ, सोनिया वैद्य, अशोक काकडे, परमेश्‍वर राऊत, चंद्रकांत हिंगे, सुनिता येरणे, ओबीसी पिछडा शोषित महासंघाचे प्रा. रमेश पिसे, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे आली सहभागी झाले होते.

आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीने बैठक बोलवली आहे. बैठकीसाठी डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी मुंबईला रवाना झाले. 

संपादन  : अतुल मांगे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com