नागपुरात वाढल्या फसवणुकीच्या घटना; एकाच दिवसात व्यापाऱ्यांना घातला तब्बल ५० लाखांचा गंडा 

अनिल कांबळे 
Friday, 18 December 2020

अखेर येळणे यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे लिखित तक्रार केली. कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. पोलिस प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी मुंदडा याने येळणे यांच्याकडून एका मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या नावेही १२ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. 

नागपूर ः पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची ४० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी व्यापाऱ्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. मुंदडा असे फसवणूक करणाऱ्याचे तर सागर येळणे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर कर्ज मिळवून देण्याच्या नावावर तीन आरोपींनी एका व्यापाऱ्याला १०.४२ लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आर्य अपार्टमेंट, ओमकारनगर निवासी श्रीपाद नारायण सेनवई (५५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.

येळणे हे धान्याचे व्यापारी आहेत. दोन वर्षांपूर्वी येळणे यांची मुंदडासोबत ओळख झाली. येळणे यांनी पेट्रोल पंप मिळविण्यासाठी अर्ज केला. संपूर्ण प्रक्रिया करून पेट्रोल पंप मिळवून देतो, असे आमिष मुंदडा याने येळणे यांना दिले. येळणे यांच्याकडून मुंदडा याने वेळोवेळी एकूण ४० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही मुंदडा याने येळणे यांना पेट्रोल पंप मिळवून दिला नाही. येळणे यांनी मुंदडा याला पैसे परत मागितले असता त्याने टाळाटाळ केली. 

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

अखेर येळणे यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे लिखित तक्रार केली. कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. पोलिस प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी मुंदडा याने येळणे यांच्याकडून एका मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या नावेही १२ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. 

कर्जाच्या नावावर व्यापाऱ्याला गंडा 

कर्ज मिळवून देण्याच्या नावावर तीन आरोपींनी एका व्यापाऱ्याला १०.४२ लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आर्य अपार्टमेंट, ओमकारनगर निवासी श्रीपाद नारायण सेनवई (५५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये आशीष गर्ग, इशा गर्ग, साक्षी गोयल यांचा समावेश आहे. श्रीपाद हे कंपनीचे संचालक आहेत. व्यवसायासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. ८ सप्टेंबरला आरोपींनी त्यांना फोन केला. त्यांच्या कंपनीकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. 

क्लिक करा - पवित्र नात्याला काळिमा! सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी

श्रीपाद यांनी त्यांना १.३० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोपींनी वेळोवेळी कर्ज मिळवून देण्यासाठी विविध कारणे सांगून स्वतःच्या खात्यात १०.४२ लाख रुपये जमा करून घेतले. दोन महिने लोटल्यानंतरही जेव्हा श्रीपाद यांना कर्ज मिळाले नाही, तेव्हा त्यांनी आपले पैसे परत मागितले. आरोपी टाळाटाळ करू लागले. शेवटी कंटाळून श्रीपाद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men did fraud with 2 businessmen in Nagpur