esakal | नागपूर मध्यवर्ती कारागृहात किन्नरावर अत्याचार प्रकरण; अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांवर गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Misbehavior with transgender in Nagpur central jail FIR against officers

आरोपींमध्ये सात अधिकारी व कर्मचारी आणि दोन कैद्यांचा समावेश आहे. कारागृह कर्मचारी सचिन टिचकुले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद कांदे, गेट तुरुंगाधिकारी भोसले, तुरुंगाधिकारी कारपांडे, वानखेडे, गोल तुरुंगाधिकारी नाईक आणि मुकेश यादव व दर्शनसिंग कपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. 

नागपूर मध्यवर्ती कारागृहात किन्नरावर अत्याचार प्रकरण; अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांवर गुन्हा दाखल 

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर ः खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या किन्नराने तेथील कर्मचारी व सहकैद्यांकडून अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करीत कारागृह प्रशासनात खळबळ उडवून दिली. सोबतच याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली. धंतोली पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी व कैदी अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींमध्ये सात अधिकारी व कर्मचारी आणि दोन कैद्यांचा समावेश आहे. कारागृह कर्मचारी सचिन टिचकुले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद कांदे, गेट तुरुंगाधिकारी भोसले, तुरुंगाधिकारी कारपांडे, वानखेडे, गोल तुरुंगाधिकारी नाईक आणि मुकेश यादव व दर्शनसिंग कपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. 

 हेही वाचा - रेल्वेच्या बोगीत बेशुद्धावस्थेत सापडला युवक; डॉक्टरांना पाचारण करताच समोर आली धक्कादायक माहिती  

धंतोली पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गोपनीयता बाळगली आहे. जिल्हा न्यायालयाला त्याने पत्र लिहिले. त्याचाही उपयोग न झाल्याने उच्च न्यायालयात धाव घेत अॅड. राजेश नायक यांच्या मार्फत याचिका दाखल केली. कारागृह कर्मचारी आणि कैदी संधी मिळताच बळजबरीने अत्याचार करीत असल्याचा आरोप त्याने याचिकेतून केला आहे. 

हवालदार सचिन टिचकुले, पोलिस उपनिरीक्षक कारपांडे, भोसले, कैदी मुकेश यादव आणि दर्शनसिंग कपूर यांच्यावर त्याने गंभीर आरोप केले आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याप्रकरणी कारागृह अधीक्षक, उप महानिरीक्षक कारागृह यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पीडित किन्नराला कारागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री धंतोली पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले. पीडिताने टिचकुलेवर लैंगिक छळ केल्याचा व अन्य आरोपींनी विनयभंग केल्याची तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक २४ तास लसीकरण केंद्र; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

पुरुषांच्या बराकमध्ये होता

बहुचर्चित चमचम गजभिये हत्याकांडात या प्रकरणातील पीडित किन्नरासह साथीदारांना अटक करण्यात आली असून तो मध्यवर्ती कारागृहात आहे. पुरुषांच्या बराकमध्येच त्यालाही ठेवण्यात आले आहे. अन्य साथीदारांना जामीन मिळाला असून तो कारागृहात एकटाच किन्नर आहे. वेगळे बराक मिळावे, अशी विनंती त्याने अनेकदा कारागृह प्रशासनाकडे केली. मात्र, त्याकडे लक्षच दिले गेले नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top