नागपूरचे मिहान देखील हळूहळू होतेय अनलॉक, हे उद्योग झाले सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील मिहान प्रकल्पात "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत विविध कंपन्यांनी कामाचा श्रीगणेशा केला आहे. यामध्ये रिलायन्स, मेटाटेक एअर सिस्टिम इंडिया प्रा. लि. प्रवेश एक्‍सपोर्ट प्रा. लि. या कंपन्या शंभर टक्के कर्मचारी उपस्थितीत आहेत. तसेच ताल मॅन्युफॅक्‍चरिंग सोल्युशन लि., रिलायन्स (डीआरएएल) कनव ग्रो, डाएट फूड इंटरनॅशनल, स्टेनोस्पेअर इंडिया प्रा. लि. इतर उद्योगही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सुरु झाले आहेत. त्यात 28 ते 75 टक्के कर्मचारी व कामगार कामावर आहेत.

नागपूर : राज्य शासनाच्या "मिशन बिगीन अगेन' नुसार सोशल डिस्टन्सिंगसह आवश्‍यक उपाययोजना लागू केल्यानंतर मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील 15 तर विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील 12 उद्योगांचे कामकाज सुरू झालेले आहे. त्यात रिलायन्स, ताल मॅन्युफॅक्‍चरिंग सोल्युशन, ल्युपिन लिमिटेड, एच. सी. एल. टेक्‍नालॉझी, टेक महिंद्रा या महत्वाच्या कंपन्याचा समावेश आहे. 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील मिहान प्रकल्पात "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत विविध कंपन्यांनी कामाचा श्रीगणेशा केला आहे. यामध्ये रिलायन्स, मेटाटेक एअर सिस्टिम इंडिया प्रा. लि. प्रवेश एक्‍सपोर्ट प्रा. लि. या कंपन्या शंभर टक्के कर्मचारी उपस्थितीत आहेत. तसेच ताल मॅन्युफॅक्‍चरिंग सोल्युशन लि., रिलायन्स (डीआरएएल) कनव ग्रो, डाएट फूड इंटरनॅशनल, स्टेनोस्पेअर इंडिया प्रा. लि. इतर उद्योगही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सुरु झाले आहेत. त्यात 28 ते 75 टक्के कर्मचारी व कामगार कामावर आहेत. 

एअर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कामगार कार्यरत असून नियमित कामाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योगांमध्ये लुपिन लिमिटेड, एच. सी. एल. टेक्‍नॉलॉजी, हेवी एक्‍स वेअर बीसीएस इन्फोसिस लिमिटेड, टी. सी. एस. लि., टेक महिंद्रा आदी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग समूहांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश उद्योगात"वर्क फ्रॉम होम'नुसार नियमित कामकाज सुरू आहे. 

तुकाराम मुंढेंच्या ट्विटरवर आदित्य ठाकरेंची कमेंट, नागनदीबाबत म्हणाले...

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर एम्स नागपूर, बीसीसीएल प्लॅन्यूमेट., बी. पी. एस., कॉन्कोर, डी. वाय. पाटील स्कूल, एफ. एस. सी. महिंद्रा डेव्हलपर प्रा. लि., मोराज इन्फ्रा प्रा. लि., टी. सी. आय. इन्फ्रा लि., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय विद्या भवन आदी सेवा क्षेत्रातील 12 उद्योगांमध्ये "मिशन बिगीन अगेन'नुसार सुरुवात झाली आहे. मिहानच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामध्ये असलेले विकास आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण प्रकल्प अल्टिएस, एस. बी. आय. बॅंक, कॅनरा बॅंक, बालाजी सर्व्हिसेस येथेही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून कामकाज सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission Begin Again in Mihan